चिमुकल्याने गिळलेली दोन नाणी बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश!
पुणे (सुनिल सांबारे): लोणी येथील सात वर्षीय चिमुकल्याने दोन रुपयांची नाणी गिळली होती. विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. विक्रम पाटील यांनी बालकास कसलीही दुखापत न करता एंडोस्कोपीकरून बाहेर काढल्याने बालकाचे कुटुंबीय व नागरिकांनी डॉक्टरांचे आभार मानले.
कदमवाकवस्ती येथील लोणी स्टेशन परिसरात राहत असलेल्या शिवतेज या सात वर्षीय मुलाने खेळता खेळता दोन रुपयाची दोन नाणी गिळली होती. कुटुंबीयांनी चिमुकल्यास तत्काळ विश्वराज हॉस्पिटल येथे वेळ न घालवता दाखल केले होते. डॉक्टरांनी एक्सरे केल्यावर निष्पण झाले की, बालकाने एक नाही तर दोन नाणी गिळाली आहेत. त्यामुळे पुढील उपचारासाठी डॉक्टरांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. परंतु डॉ. विक्रम पाटील यांनी मोठ्या शिताफिने दोन्ही नाणी बाहेर काढली.
डॉ. विक्रम पाटील म्हणाले कि, ‘ग्रामीण भागात अशा प्रकारच्या घटना सारख्या घडत असतात मुलाला विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल परंतु कुटुंबियांकडून अर्धवट दिली. माहितीने घरी केलेले उपचार बालकांसाठी हानिकारक ठरवू शकते. त्यामुळे अशी घटना घडल्यास रुग्णास त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करावे.’
दरम्यान, डॉ. विक्रम पाटील यांनी आजपर्यंत बालकांनी गिळलेले नाणी, सुया, वस्तरा ब्लेड, चुंबक, दात वस्तू बाहेर काढल्या आहेत. परंतु, एका वेळेस दोन नाणी हे त्यांनी पहिल्यांदाच काढली असल्याची माहिती दिली.
एखाद्या मुलाला गिळण्यात अडचण येत असेल, लाळ जमा होत असेल, छातीत दुखत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तसेच वृद्ध रुग्ण चुकून खोटे दात गिळू शकतो, असे घडल्यास रुग्णाला फीड देऊ नका. कारण यामुळे एंडोस्कोपीचा वेळ वाढू शकतो (एंडोस्कोपीला एनपीओ आवश्यक आहे) एन्डोस्कोपिक काढणे ही एक शस्त्रक्रिया नाही, ही केवळ तोंडाद्वारे केली जाणारी प्रक्रिया आहे, असे डॉ. विक्रम पाटील यांनी सांगितले.
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!