नाशिक! माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, आता तुम्ही तेच काम करा…

नाशिक : नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात एक व्यावसायिक फोटोग्राफर युवती व तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये जबरदस्तीने डांबून, पिस्तुलाचा धाक दाखवत अनैतिक व्यवसाय करण्याबाबत सांगितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात हॉटेलचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सुमारे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत पीडित युवतीने सुरुवातीला भीतीपोटी तक्रार केली नव्हती. मात्र, आरोपीकडून पुन्हा धमक्या आल्यानंतर अखेर तिने पोलिसांत धाव घेतली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित हॉटेल चालक सौरभ संजय देशमुख आणि त्याचा साथीदार वेटर मोहीत मिलिंद ताम्हाणे यांना अटक केली. नाशिक जिल्हा न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयित सौरभ देशमुख याचे ‘कॅटल हाउस’ नावाचे हॉटेल असून, त्याच्यावर यापूर्वीही बेकायदेशीर कृत्यांबाबत पोलिसांनी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सौरभ हा एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा मुलगा आहे. त्याच्याकडून हॉटेलमध्ये अनेकदा अनैतिक व गैरकायदेशीर व्यवहार होत असल्याच्या तक्रारी असून, पोलिसांपासून बचावासाठी तो आणि त्याचे कर्मचारी वैयक्तिक वॉकी-टॉकी वापरत असल्याचेही उघड झाले आहे.

पीडित युवती आणि तिच्या मैत्रिणीचा वेटर मोहीत ताम्हाणे याच्याशी पूर्वीपासून ओळख होती. त्याने 2020 पासून त्यांच्याकडून आर्थिक मदत घेतली होती. एके दिवशी तो ‘कॅटल हाउस’ हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर त्या दोघी व त्यांचा एक मित्र तिथे गेले. तेव्हा हॉटेलमालक सौरभ देशमुख याने त्यांना थेट धमकी देत म्हटले की, “तुम्ही इथे येऊन मोठी चूक केली आहे. माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, आता तुम्ही दोघीही तेच काम करा. चांगले पैसे देईन, आणि मोहीतकडून पैसे मागण्याची गरजही भासणार नाही,” असे म्हटले.

धक्कादायक प्रसंगानंतर तिघांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, देशमुख याने त्यांच्यावर पिस्तूल रोखून त्यांना बंद खोलीत डांबून ठेवले. त्याने जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या जवळील 21 हजार रुपये काढून घेतले. अखेर पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना सोडण्यात आले. पण, काही दिवसांनी मोहीत ताम्हाणे याने व्हॉट्सॲपवरून पुन्हा धमकीचे मेसेज पाठवले. त्यामुळे पीडित युवतींनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी विनयभंग, जबरदस्ती, डांबून ठेवणे, दरोडा, धमकी देणे अशा विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात देशमुख व ताम्हाणे यांच्यावर पूर्वीही असेच आरोप असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक! नवविवाहित पत्नीच्या प्रियकराकडून नवऱ्याचे अपहरण करण्याचा थरारक प्रयत्न…

नाशिक! प्रेमीयुगुलाने हातात हात घेऊन मारली रेल्वेसमोर उडी…

नाशिक! अल्पवयीन मुलीची सोनोग्राफी करताच बसला धक्का; नराधम निघाला…

नाशिक! प्रेमसंबंध ठेवण्यास भाग अन् गळ्यात हात टाकलेला फोटो केला शेअर…

नाशिक! बहिणीला प्रपोज केल्याने युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!