पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…
पुणे : पुणे शहरातील पोर्शे अपघातानंतर आणखी एका अल्पवयीन मुलाकडून वानवडीत भीषण अपघात झाला आहे. एक 14 वर्षांचा अल्पवयीन मुलगा चालवत असलेल्या टँकरने आज (शनिवार) सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेलाही या धडक दिली आहे. दरम्यान, सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.
टँकर अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानै पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या वानवडी येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या अपघातात काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवले आहे.
दरम्यान, पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर देखील अनेक गंभीर अपघात घडत आहेत. एका हायवा ट्रकने मार्केटयार्ड येथे एका महिलेला चिरडले होते. तसेच, कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता युवतीचा जीव गेला होता. उंड्री येथे ट्रक दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका युवतीला जीव गमवावा लागला होता. एका पाठोपाठ एक असे अनेक अपघात घडत असताना देखील अनेक अल्पवयीन मुले वाहने चालवताना शहरात दिसत आहेत. त्यातच अवजड टँकर अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. या अपघातात मुलीही जखमी झाल्या आहेत.
पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल…
पुणे पोर्श अपघात प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं ए टू झेड…
भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…
भीषण अपघात! सांगलीत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे….
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…