महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेसह इतरांवर न्यायालयात आरोपपत्र दाखल…
ठाणे: कल्याण-डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांवर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी असलेले शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर चार आरोपींविरुद्ध कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह रमेश पवार, प्रमोद निकम, अक्षय करंडे आणि साधना करंडे यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. ६ जुलै रोजी […]
अधिक वाचा...पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल…
पुणे: पुणे शहरात गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडी लक्षात घेता पुणे शहर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात नागरिकांची सुरक्षितता जपण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्त्यांवर जड व अवजड वाहनांना २४ तास प्रवेशबंदी लागू केली आहे. पुणे शहरात गणेशोत्सव काळात गणपतीचे देखावे पाहण्यासाठी, […]
अधिक वाचा...शालेय विद्यार्थिनींशी शिक्षकाकडूनच अश्लील चाळे; खरपूस चोप देऊन गावकऱ्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात…
वाशिमः महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलानंतर आता चिमुकल्या मुलींसोबत अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत एका बस चालकाने चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता वाशिममध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका ५६ वर्षीय शिक्षकानेच वर्गातील विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या […]
अधिक वाचा...हनीट्रॅपमध्ये अडकवून कल्याणच्या नागरिकाला ब्लॅकमेल; १७ लाख रुपये उकळले; ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल…
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील एका व्यक्तीला (वय ५६), त्याचा एक आक्षेपार्ह व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देऊन, एका पोलिस कर्मचाऱ्यासह सात जणांनी १७.६५ लाख रुपयांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. गुरुवारी नोंदवलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार (एफआयआर), कल्याण येथे राहणाऱ्या आणि एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या पीडित व्यक्तीला एका २८ वर्षीय महिलेने हनीट्रॅपमध्ये […]
अधिक वाचा...तोतया पीएमओ अधिकारी रोहन पारेखला करायचे होते प्रेयसीला ‘इंप्रेस’…
मुंबईः पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्याचे (पीएमओ) बनावट ओळखपत्र तयार करून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये संशयास्पदरित्या फिरणारा उच्चशिक्षित आरोपी रोहन पारेख, याने कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून अगदी हुबेहुब पीएमओ अधिकाऱ्याचे बनावट कार्ड तयार केले होते. येथील जिओ वर्ल्ड प्लाझात तीन जण घुसले होते. त्यांनी सुरक्षा व्यवस्थेला गुंगारा देण्याचा सोमवारी प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाचे इतर पदर […]
अधिक वाचा...कोस्टल रोडच्या बोगद्यात कार आणि टॅक्सीची जोरदार धडक; वाहतूक ठप्प…
मुंबई: नरिमन पॉइंटवरून वरळीच्या दिशेने जाणाऱ्या कोस्टल रोडच्या बोगद्यात, संध्याकाळी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास एक भरधाव कार आणि टॅक्सीमध्ये जोरदार धडक झाली. ऐन गर्दीच्या वेळी हा अपघात झाल्याने रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि संपूर्ण मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. सायंकाळी घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. अपघाताची माहिती मिळताच मुंबई वाहतूक पोलीस आणि […]
अधिक वाचा...इन्स्टाग्रामवर रील टाकून ५ रुपयांत ५१ लाख रुपयांचे अमिष; मुंबईत ३ लाखांची फसवणूक…
मुंबईः वरळी परिसरात ५ रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात तब्बल ५१ लाख रुपये मिळवून देण्याचे अमिष दाखवत, एका व्यक्तीची ३ लाख ३ हजार २३१ रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी इन्स्टाग्रामवरील रीलच्या माध्यमातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत ही फसवणूक केल्याची माहिती आहे. तक्रारदाराने इन्स्टाग्रामवर एक रील पाहिली होती. त्यात ५ रुपयांच्या जुन्या […]
अधिक वाचा...कुख्यात अबू सालेमला ‘सर्वोच्च’ दणका; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुदतपूर्व सुटकेची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…
नवी दिल्लीः १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गँगस्टर अबू सालेमची २५ वर्षांचा कारावास पूर्ण झाल्याच्या आधारावर सुटकेची मागणी करणारी याचिका कोर्टाने फेटाळली आहे. दरम्यान, २००५ मध्ये पोर्तुगालमधून भारतात आणताना २५ वर्षांपेक्षा अधिक कारावास न देण्याचे भारत सरकारने आश्वासन दिले होते. अंडरट्रायल काळ, दोषसिद्धीनंतरचा कारावास आणि […]
अधिक वाचा...पालघर रुग्णालय हल्ला प्रकरणी पोलिसांच्या कारभारावर उच्च न्यायालयाचे ताशेरे…
मुंबई: पालघर येथील एका खासगी रुग्णालयात तोडफोड आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई न केल्याबद्दल, मुंबई उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांवर अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. हे अतिशय संवेदनशील प्रकरण असूनही पोलिसांनी या प्रकरणात अजिबात तपास केलेला नाही हे पूर्णपणे अयोग्य आणि अस्वीकारार्ह आहे, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले. […]
अधिक वाचा...पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन; शेवटच्या नोटमध्ये लिहिलं…
पुणे : पुणे शहरात एमपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी आलेल्या युवकाने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रथमेश दिलीप देशमुख (वय २५, मुळ रा. परंडा, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. प्रथमेश […]
अधिक वाचा...
