
पुणे! गणेश विसर्जन मिरवणुकीतील पोलिसांसाठी जनहितम् संघटनेचा सेवाभावी उपक्रम…
पुणे (संदिप कद्रे) : गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान पुणे शहरात सलग ४० तास रात्रंदिवस बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिस बांधवांसह स्वयंसेवकांसाठी जनहितम् संघटना आणि बिबवेवाडी वारकरी सेवा मंडळातर्फे यंदाही सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. गेल्या २१ वर्षांपासून कोणताही स्वार्थ न ठेवता ही सेवा सातत्याने सुरू आहे.
बंदोबस्तावर असलेल्या सुमारे ५ हजार २५० पोलिस बांधव आणि स्वयंसेवकांसाठी स्नेहभोजन, फूड पॅकेट, नाष्टा तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यासोबतच राव हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच पोलिसांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबिर व रुग्णवाहिकेचे उद्घाटन सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन पवार यांच्या हस्ते स्वारगेट पोलिस ठाण्याच्या आवारात करण्यात आले.
View this post on Instagram
कार्यक्रमात पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त संजय पाटील, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त मिलिंद मोहितेपाटील, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, वेल्फेअरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विकास भारमळ तसेच वरिष्ठ पत्रकार अनिल सावळे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन जनहितम् संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामविलास माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी राजेश चाहर, नितीनशेठ चोरडिया, रितेश राठी, राजुशेठ चोपडा, नितीनशेठ डांगी, महेंद्रभाई, निखिल राठी, अशोक चौधरी, नितीन ब्राह्मणकर, ज्योती महाबळेश्वरकर, फिरोज शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधिकारी व कर्मचारी सलग अनेक तास कर्तव्य बजावत असतात. त्यांच्या आरोग्याची आणि भोजनाची काळजी घेत गेल्या २१ वर्षांपासून जनहितम् संघटना व बिबवेवाडी वारकरी सेवा मंडळाकडून सुरू असलेली ही सेवा सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरत आहे.
पुणे पोलिस दलातील हवालदाराचा बंदोबस्तादरम्यान हृदयविकाराने मृत्यू…
हृदयद्रावक! पुणे शहरात विसर्जन मिरवणुकीत ट्रॉलीखाली आल्याने हलगी वादकाचा मृत्यू…
पुणे! विद्यानंद बापट यांचा इम्पॅक्ट, 14 डीजे चालकांवर गुन्हे दाखल…
पुणे शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल…

