पुणे पोलिस आयुक्त उतरले थेट रस्त्यावर, गणेश मंडळांना भेटी अन् सूचना…
पुणे: पुणे शहरातील गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था तसेच पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी पुण्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी थेट मैदानावर उतरले आहेत. पुण्यात सध्या गाजत असलेल्या ‘डीजेबंदी’च्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तयारीची पाहणी केली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अमितेश कुमार यांनी […]
अधिक वाचा...डॉक्टरांची भावनिक पोस्ट प्रचंड व्हायरल अन् चिमुकलीचे आई-वडील आले समोर; धक्कादायक कारण…
पुणे : पुणे जिल्ह्यातील देहू जवळ असलेल्या भंडारा डोंगरावर रविवारी (ता. 6) एक दीड वर्षाची चिमुकली एकटीच सापडली होती. चिमुकलीला YCM हॉस्पिटल पिंपरी चिंचवड येथे बालरोग विभागात दाखल करण्यात आले होते. चिमुकलीची अवस्था पाहून पोलिस आणि डॉक्टरही भावुक झाले होते. पोलिसांना तपासात मदत करण्यासाठी डॉ. प्रकाश कोयाडे यांनी चिमुकलीबद्दल एक भावनिक पोस्ट लिहिली आणि ती […]
अधिक वाचा...महिला डॉक्टर मारहाण प्रकरण; ‘म्हात्रेसारख्यांना मोकाट फिरण्याचा अधिकार नाही’ – सर्वोच्च न्यायालय…
नवी दिल्ली: ठाण्यातील रुग्णालयात जुलै महिन्यात डोंबिवलीतील रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करणारे शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामिनाला, राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी रमेश म्हात्रे यांना नोटीस बजावत तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने अशा लोकांना रस्त्यावर मोकाट फिरण्याचा अधिकार नाही, […]
अधिक वाचा...पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमापूर्वी खळबळ; बनावट पीएमओ अधिकाऱ्यासह बंदुकधारी अंगरक्षकाला अटक…
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमापूर्वी मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्क करणारी घटना घडली. सोमवारी ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’च्या कार्यक्रमस्थळी पंतप्रधान कार्यालयातील (पीएमओ) अधिकारी असल्याचे भासवून, बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या रोहन पारिख (वय २४) याच्यासह दोन तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यांना मंगळवारी (ता. ८) अटक […]
अधिक वाचा...लोकांवर हल्ला करणाऱ्या वाघिणीला ठार मारा; अमरावतीत वाघिणीच्या हल्ल्यात दोघांच्या मृत्यूनंतर नवनीत राणा यांची मागणी…
अमरावतीः चांदूरबाजार तालुक्यातील सोनोरी येथे २२ वर्षीय तरुणीचा वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर, आता शिरजगाव कसबा परिसरात एका शेतकऱ्यावर वाघिणीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे अवघ्या २४ तासांत वाघिणीच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने, परिसरात वाघिणीच्या दहशतीने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदूरबाजार आणि मोर्शी […]
अधिक वाचा...महिला गोविंदा पथकातील महिलांनी बिस्किटाचे आवरण पेट्रोल पंपाच्या आवारात टाकल्यावरून केला राडा…
विरार: बिस्किटाचे आवरण पेट्रोल पंपाच्या आवारात टाकल्यानंतर चालू झालेल्या वादाचे पर्यवसान, थेट हाणामारीत झाल्याची घटना विरार पश्चिमेतील वटार परिसरात घडली. दहीहंडीनंतर सहलीसाठी नवापूरला गेलेल्या मुंबईतील एका महिला गोविंदा पथकाच्या सदस्यांचा, मनवेल पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. त्यानंतर एका कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याने तो जखमी झाला. या संपूर्ण प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शनिवारी […]
अधिक वाचा...वाहनावरील नियंत्रण सुटल्याने खारेगावमध्ये अपघातात महिला मृत्यूमुखी; दोन पादचारी गंभीर जखमी…
ठाणे: कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खारेगाव येथे एका भरधाव कारने अनेक वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शुभांगी पाटील असे मृत महिलेचे नाव असून, त्या खारेगाव येथील स्थानिक रहिवासी होत्या. वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. खारेगाव येथील गजबजलेल्या परिसरातून जात […]
अधिक वाचा...मुंबईत व्यापाऱ्यावर बोगस छापा; १ कोटीची मागणी; अखेर खऱ्या पोलिसांच्या छाप्यात ६ जणांना बेड्या…
मुंबई: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्पेशल २६’ सिनेमात बोगस प्राप्तिकर अधिकारी दाखवून लूट करण्यात येत असल्याचे दाखवण्यात आले होते. तथापि, याच धर्तीवर बनावट प्राप्तीकर अधिकारी बनून अंधेरीत छापा घालण्यात आला आहे. याप्रकरणी, पोलिसांनी तोतया अधिकाऱ्यांना अटक केली आहे. अंधेरी परिसरातील या व्यावसायिकाच्या कार्यालयात प्राप्तिकर आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे […]
अधिक वाचा...जखमी गोविंदांच्या उपचारावरून पालघरच्या रुग्णालयात कर्मचाऱ्याला मारहाण; शिवसेना आमदाराच्या मुलासह १७ जणांविरुद्ध गुन्हा…
पालघर: दहीहंडी उत्सवादरम्यान जखमी झालेल्या गोविंदांच्या उपचारावरून पालघरमधील खासगी रुग्णालयात वाद झाल्याची घटना समोर आली आहे. सीटी स्कॅन आणि डिस्चार्जच्या मुद्द्यावरून झालेल्या या वादात रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख कुंदन संखे, आमदार राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित आणि शहरप्रमुख राहुल घरत यांच्यासह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा...एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या १,३२२ कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळाप्रकरणी सीबीआयतर्फे सुभाष चंद्रा यांच्याविरुद्ध गुन्हा…
मुंबईः केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडकडून घेतलेल्या १,३२२ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कर्जांमधील कथित अनियमिततेप्रकरणी एस्सेल ग्रुपचे अध्यक्ष सुभाष चंद्रा आणि इतर काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या तक्रारीनंतर ३१ ऑगस्टला हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चंद्रा यांनी कर्जदार कंपन्या आणि त्यांच्या संचालकांसह आर्थिक मदत मिळवण्यासाठी निव्वळ मालमत्तेचा […]
अधिक वाचा...
