घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन सदस्य अपात्र प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजीचे दोन संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे, संचालक आशिष सुरेश लोणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठात रिट याचीका दाखल केली आहे. सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण (यवतमाळ) यांनी दिलेल्या आदेशाला आवाहन दिले आहे.

सदर प्रकरणात सचिव सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग मुंबई, विभागीय सहनिंबधक सहकारी संस्था अमरावती, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ, कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव कपिल चन्नावार व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितिन अशोक कोठारी यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचीका दाखल करुन स्थगितीची मागणी केली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आज झालेल्या सुनावणीत दोन संचालक अपात्र प्रकरणात कोणताही निर्णय घेऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी दिला आहे. याचिकाकर्ते संचालक अभिषेक ठाकरे व संचालक आशिष लोणकर यांच्यातर्फे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर, ॲड. यशोवर्धन सांबरे यांनी उच्च न्यायालयात युक्तिवाद केला. दरम्यान, सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 12 सप्टेंबर 2024 रोजी उच्च न्यायालयात होणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती घाटंजी येथे कापसाच्या लिलावा प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितिन अशोक कोठारी व माजी सभापती अभिषेक शंकरराव ठाकरे, संचालक आशिष सुरेश लोणकर यांच्यात शेतकऱ्यांच्या कापसाच्या दरा वरुन वाद उपस्थित झाला होता. या वेळी काही शेतकऱ्यांनी घटनेचे व्हिडिओ क्लिप सुद्धा काढले होते. सदर प्रकरणात घाटंजी पोलिस स्टेशनला तक्रारी सुद्धा करण्यात आल्या व घाटंजी पोलीसांनी चौकशी सुद्धा केली होती. त्यावेळी घाटंजी तालुक्यातील कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पुढे रास्तारोको सुद्धा केला होता. मात्र, संबंधित व्यापाराने शेतकऱ्यांचे काही एक ऐकले नाही व कापसाचे दर सुद्धा वाढविले नाही, हे विशेष. विशेष म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व संचालक अभिषेक शंकरराव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती नितिन कोठारी, उपसभापती सचिन पारवेकर विरुद्ध या पुर्वी दाखल केलेली याचिका प्रलंबित व सुरु आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल रिट याचीकेचा क्रमांक WP/5048/2024 (संचालक अभिषेक ठाकरे) व WP/5052/2024 (संचालक आशिष लोणकर) असा आहे. याचीकाकर्ता यांनी अनुच्छेद 226, 227 अंतर्गत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. सदर प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नितिन कोठारी व सचिव कपिल चन्नावार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ॲड. रंजीत सिंग गहीलोत यांच्या मार्फत कॅव्हेट दाखल केला आहे. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 12 सप्टेंबर 2024 रोजी असुन याचीकातर्फे वरिष्ठ वकील ॲड. सुनील मनोहर, ॲड. यशोवर्धन सांबरे हे काम पाहत आहेत.

संशयास्पद! आई-मुलीचा बंद पेटीत तर वडिलांचा बाथरूममध्ये कुजलेला मृतदेह…

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…

बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…

हृदयद्रावक! आईच्या शरीराला बांधलेले चिमुकल्यांचे मृतदेह तलावात आढळले…

नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!