दिल्ली मेट्रोमध्ये जागेवरून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू; माजी आयएएस अधिकाऱ्यासह मुलाला अटक…

नवी दिल्ली: दिल्ली मेट्रो ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या जागेवरून झालेल्या वादात एका ४८ वर्षीय व्यक्तीला थप्पड मारून जोरात ढकलून दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती, पोलिसांनी येथे दिली. या प्रकरणी एक माजी आयएएस अधिकारी आणि त्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्थानकामध्ये घडली होती. मयत पवन शर्मा […]

अधिक वाचा...

मोठा ट्विस्ट! मॉडेल श्रद्धा दुबेच्या खोलीत आढळल्या शक्तीवर्धक गोळ्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): देशभर गाजत असलेल्या रेस्टॉरंट व्यावसायिक शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून मुख्य फरार आरोपी मॉडेल श्रद्धा दुबे हिच्याबाबत पोलीस तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. हजरगंज पोलिसांनी जेव्हा श्रद्धा दुबे हिच्या फ्लॅटची झडती घेतली, तेव्हा तिथे काही शक्तिवर्धक औषध साठा आढळून आला आहे. तसेच, घटनेच्या दिवशी त्या फ्लॅटमध्ये श्रद्धा दुबे […]

अधिक वाचा...

सीजेपीचे जंतर मंतरवर आंदोलन, गुरुग्राममधील घरातून युट्युबर ध्रुव राठीला घेतले ताब्यात – सीजेपीचा दावा…

नवी दिल्लीः मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी), ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’ व इतर विद्यार्थी व राजकीय संघटनांनी आज जंतरमंतर येथे आंदोलन पुकारले आहे. नियोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी आज […]

अधिक वाचा...

दिल्लीच्या सीमापुरी भागात इमारत कोसळून चार जण मृत्यूमुखी, आठ जण जखमी…

नवी दिल्ली: ईशान्य दिल्लीतील सीमापुरी परिसरात बुधवारी (ता. ७) चार मजली इमारत कोसळल्याने चार जणांचा मृत्यू झाला आणि तीन वर्षांच्या मुलासह किमान आठ जण जखमी झाले, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्याने दिली. आज (गुरुवारी) सकाळी ढिगाऱ्याखालून आणखी एक मृतदेह बाहेर काढण्यात आल्याने मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. इमारत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत […]

अधिक वाचा...

खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे दिल्लीतही सर्वत्र तपास…

नवी दिल्ली: गाझियाबादच्या खासदार-आमदार न्यायालयाने २०१८ मधील एका मारहाणीच्या प्रकरणात, खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वेळोवेळी वॉरंट जारी केल्यानंतरही न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्याने हे वॉरंट बजावण्यात आले आहे. न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीत आझाद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या तक्रारीच्या संदर्भात, […]

अधिक वाचा...

निलंबित केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पा सावकार व सदस्य गीता यांना अटक; भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई…

बंगळूर: अंमलबारी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा एस. सावकार आणि सदस्य बी. व्ही. गीता यांना अटक केली आहे. काही परीक्षांच्या आयोजनातील अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी, अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांना अटक केली. शिवशंकरप्पा सावकार आणि बी. व्ही. गीता यांना ६ ऑक्टोबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए तरतुदींनुसार ताब्यात […]

अधिक वाचा...

आकाशवाणी भवनात बेकायदा धरणे; राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी केली एफआयआर दाखल…

नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या इंडिया ब्लॉक आंदोलनादरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा यांनी मंगळवारी (ता. ६) आकाशवाणी भवनच्या आवारात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी, दिल्ली पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, विरोधी पक्षांच्या आघाडीने संसद भवनापासून निर्वाचन सदनापर्यंत (नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाचे मुख्यालय) मोर्चा […]

अधिक वाचा...

सहवैमानिकाच्या हल्ल्यामुळे कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कवटीला झालेल्या फ्रॅक्चरवर सौदी अरेबियात शस्त्रक्रिया…

अबू धाबीः दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानावरील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले शूर वैमानिक कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीबाबत नवीन खुलासे समोर आले आहेत. ओमानचा सहवैमानिक हम्मामी याने कॅप्टन स्मित यांच्या डोक्यावर प्रहार केला होता, ज्यामुळे त्यांच्या कवटीला तडा गेला होता. हल्ल्यादरम्यान कॅप्टन स्मित यांच्या हाडाला ‘डिप्रेस्ड फ्रॅक्चर’ झाले होते आणि सौदी अरेबियामध्ये त्याच्यावर तातडीचे उपचार […]

अधिक वाचा...

गाझियाबादमध्ये स्वतःच्या दोन अल्पवयीन मुलांच्या समोर पत्नीला मारहाण करून पतीने केली हत्या…

गाझियाबादः येथील सदापूर परिसरात रविवारी घरगुती वादातून एका महिलेला (वय ३५) तिच्या पतीने मारहाण करून ठार केल्याची माहिती, पोलिसांनी दिली. ही घटना त्यांच्या दोन अल्पवयीन मुलांसमोर घडल्याचे सांगण्यात येत आहे. रेणू सिंग नावाच्या महिलेला तिच्या पतीने (वय ३८) वादादरम्यान मारहाण केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंतर तिला तिच्या सासरच्या मंडळींनी रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान […]

अधिक वाचा...

महात्मा गांधींची प्रतिमा असलेली नोट आक्षेपार्ह पद्धतीने हाताळण्याची रील पोस्ट केल्याबद्दल सुरतच्या महिलेस अटक…

सुरतः महात्मा गांधी यांचे चित्र असलेली ५०० रुपयांची नोट आक्षेपार्ह पद्धतीने हाताळलेली एक ‘रील’ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याच्या आरोपावरून, गुजरातमधील सुरतमध्ये एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेची ओळख सिमरन पटेल (वय ४७) अशी पटली असून, तिचे इन्स्टाग्रामवर दहा लाख फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती शहरातील अडजान परिसरात राहाते आणि तिने गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला, […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!