
सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीचा मृतदेह पाहून पत्नीने मारली सतराव्या मजल्यावरुन उडी…
बंगळुरु: एका महिला इंजिनीअरने पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर सतराव्या मजल्यावरुन उडी मारत जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
सॉफ्टवेअर इंजिनीअर भानुचंद्र रेड्डी कुंटा (वय ३२, रा. सिद्दीपेट) हे सोमवारी फ्लॅटमध्ये गळफास लावलेल्या स्थितीत आढळले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भानुचंद्र यांची पत्नी शाजियाला (वय ३१) यांनी खोलीचं दार अनेकदा वाजवले. पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घराचा दरवाडा तोडल्यानंतर नवऱ्याचा मृतदेह दिसला. यानंतर अवघ्या काही मिनिटांत शाजिया बाहेर पळाली आणि तिने इमारतीच्या सतराव्या मजल्यावरुन उडी घेतली. यामुळे तिचा मृत्यू झाला. कोणालाही काही कळायच्या आत तिनं जीव दिला होता.
भानु आणि शाजिया यांची कुटुंबं तेलंगणात राहतात. त्यांनी दिलेल्या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूंनी नोंद केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. विविध शक्यता लक्षात घेऊन पोलिस तपास करत आहेत. दोघा सॉफ्टवेअर इंजिनीअरचा अचानक मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सॉफ्टवेअर इंजिनियरचे पत्नीसोबत धक्कादायक कृत्य अन् अश्लील चित्रीकरण…
सोलापूर! इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने बॉईज हॉस्टेलमध्ये उचललं टोकाचं पाऊल…
पुणे! विद्येच्या माहेरघरात भोंदबाबाचा प्रताप; इंजिनिअर पती अन् शिक्षिका पत्नीला फसवलं…
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…
पुणे! हिंजवडीत IT इंजिनिअर युवतीने चिठ्ठी लिहून 21व्या मजल्यावरुन मारली उडी…

