कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…

कोल्हापूरः कोल्हापूरातील शाहुवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे दोन सख्ख्या भावांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. रक्षा विसर्जनाच्या वेळी त्यांच्या आईने देखील आपला प्राण सोडला आहे. या घटनेने कोल्हापूर हळहळले आहे.

कोपार्डे गावातील कडवी नदीजवळील शेतात सुहास कृष्णा पाटील (वय 36) आणि स्वप्नील कृष्णा पाटील (वय 31) हे दोघे भाऊ भात रोपणी करुन दुपारी तणनाशक फवारणीसाठी बुधवारी शेताकडे गेले होते. त्यावेळी त्यांचा वीजेच्या तारांना स्पर्श होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या आईला दोन्ही मुलांच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन रुग्णालयात त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

शेतातील पिकांवर तणनाशक फवारण्यासाठी सुहास कृष्णा पाटील आणि स्वप्नील कृष्णा पाटील हे दोघे भाऊ बुधवारी दुपारी शेताकडे गेले होते. त्यावेळी तणनाशक फवारताना सुहासला वीजेच्या उघड्या तारांचा जोरदार धक्का बसून तो शेतात पडला. त्यावेळी त्याचा भाऊ दादाला काय अचानक झाले म्हणून धावत गेला असता. त्यालाही उघड्या वीजेच्या तारांतून वीजप्रवाह शरीरात जाऊन तोही शेतात निपचित पडला. आपली दोन्ही मुले शेतातून घरी का आली नाही म्हणून त्यांचे वडील कृष्णा पाटील शेतावर गेले. त्यांनी मुलांना असे निपचित पडलेले पाहून धक्का बसला. शिवाय, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दोन्ही हातातोंडाशी आलेली मुले अशा प्रकारे गमावल्याने दोघे पालक दु:खाच्या सागरात बुडाले. मुलांची आई हे दु:ख सहन करु शकली नाही. सुहास याची पत्नी देखील दु:खाच्या सागरात बुडाली.

दोन्ही कमावत्या मुलांना गमावल्याने वृद्धापकाळातील हा आघात सहन झाल्याने नंदा कृष्णा पाटील यांना शनिवारी रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमातच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने दवाखान्यात नेले. मात्र मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. दोन मुले, पत्नी यांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नंदा यांचे पती, सून आणि एक वर्षांची नात यांचे दु:ख कधीही न मिठणारे आहे. नंदाताई पाटील यांच्यावर शोकाकुल वातावरणात आज (रविवार) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील कुटुंबांविषयी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. तसेच वीजमंडळाच्या काराभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

महिला डॉक्टरने घेतला जगाचा निरोप; कारण अस्पष्ट…

हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी धावताना अक्षय जमीनीवर कोसळला अन्…

हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!