
व्हेज बिर्याणी शॉपच्या फ्रीजरमध्ये युवकाचा मृतदेह; ओळख पटली अशी…
लखनौ (उत्तर प्रदेश) : एका व्हेज बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजरमध्ये बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. शनिवारी दुपारपासून बेपत्ता असलेला विजय पाल (वय ३८) रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला. पोलिस पुढील तपास करत आहेत.
लखनौमधील जीसीआरजी कॉलेजच्या समोर असलेल्या व्हेज बिर्याणीच्या दुकानातील फ्रीजरमध्ये विजयचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे दुकान तीन बाजूंच्या टिनच्या भिंतींनी तात्पुरतं बांधलं आहे. त्याला गेट नाही. ज्या फ्रीजरमध्ये विजय सापडला, तो डिस्कनेक्ट केलेला होता. तर दुकान गेल्या तीन दिवसांपासून बंद होते. फ्रीजरमध्ये एका युवकाची बॉडी आढळली आहे. त्याचे नाव विजय पाल असल्याची ओळख पटली आहे. त्याच्या शरीरावर कोणतीही स्पष्ट जखम नाही. आम्ही कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधत आहोत. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही” असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

बक्षीच्या तालाब येथील रहिवासी असलेला दुकान मालक अजय साहित्य घेण्यासाठी आल्यावर त्याला मृतदेह आढळल्यानंतर त्याने ताबडतोब पोलिस अधिकाऱ्यांना कळवले. पोलिसांना घटनास्थळी सापडलेला त्याचा मोबाईल फोन आणि आधार कार्डवरुन मृताची ओळख पटवली. त्यांना त्याच्या पादत्राणांबद्दल एक विचित्र तपशील देखील आढळला, विजयची एक चप्पल कॉलेजजवळील रस्त्याच्या कोपऱ्यावर आढळली, तर दुसरी दुकानात आढळली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Video! पोलिस अधिकारी अनिकेत पोटे यांची विशेष मुलाखत…
नगर हादरलं! विद्यार्थिनी घरात एकटी असताना शिक्षक यायचा अन्…
जळगाव! प्रियकराच्या मोबाईलमधील ‘अनसेंड’ मेसेजने उडवला थरकाप…
सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…

