मैत्रिणीला रंग लावला म्हणून प्रियकराने मित्राला रेल्वे रुळांवर जिवंत बांधलं अन्…

पाणीपत (हरियाणा): होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक वादातून युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मित्राला रेल्वे रुळाला जिवंत बांधले आणि त्यानंतर अंगावरून रेल्वे गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या खुनाचा छडा लावला आहे.

कालू (वय २३) असे मृत युवकाचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संजू, राहुल आणि विशाल या तीन आरोपींना अटक केली आहे. होळीच्या दिवशी कालूने संजूच्या प्रेयसीला रंग लावला होता. याचा राग संजूच्या मनात होता. याच रागातून त्याने कालूचा काटा काढण्याचे ठरवले होते.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पोलिस अधिकारी धर्मपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही हत्या केली. संजूने कालूला घराबाहेर बोलावले आणि तिघेही दारू पिण्यासाठी गेले. आरोपींनी स्वतः कमी दारू प्यायली आणि कालूला जास्त पाजली. तो पूर्णपणे नशेत गेल्यानंतर आरोपींनी त्याला रेल्वे रुळाजवळ नेले. तेथे संजूने कालूच्या गळ्यावर स्क्रू ड्रायव्हरने वार केले. तरीही तो मेला नाही, तेव्हा आरोपींनी त्याला जिवंत अवस्थेतच रेल्वे रुळाला बांधून टाकले. नशेत असल्याने कालू स्वतःचा बचाव करू शकला नाही आणि काही वेळातच अंगावरून ट्रेन गेल्याने त्याचे तुकडे झाले.

कालूने एकदा संजूची दुचाकी घेतली होती, जिचा अपघात झाला होता. या अपघाताचे पैसे कालूने संजूला दिले नव्हते, त्यावरूनही त्यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती तपासादरम्यान समरो आली आहे. सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्या असावी असा संशय होता. मात्र, कालूच्या मोबाईल लोकेशनचा डेटा आणि आरोपींच्या संशयास्पद हालचालींवरून पोलिसांना संशय आला. तपास केल्यानंतर तिन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून स्तुतीने संपवलं जीवन; मित्र-मैत्रिणीचे टोमणे पाहा…

जळगाव! प्रियकराच्या मोबाईलमधील ‘अनसेंड’ मेसेजने उडवला थरकाप…

मैत्रिणीने लग्नाची पत्रिका अ्न साडी दाखवताच प्रियकराने घेतला जगाचा निरोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!