जालना जिल्ह्यात सोमवारपासून जमावबंदीचे आदेश लागू…

जालना: जालना जिल्ह्यात सोमवारी (ता. ४) सकाळी 6 वाजल्यापासून 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी यासंबंधिचे आदेश दिले आहेत. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर परिस्थिती बिघडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे आदेश लागू केले आहेत. जमावबंदीच्या आदेशामुळे जालन्यात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विविध संघटनाकडून आत्मदहन, उपोषण, […]

अधिक वाचा...

धक्कादायक! प्रेमसंबंधातून नवऱ्यासह तीन मुलांची हत्या…

चंदीगड (हरियाणा): प्रेमसंबंधातून एका विवाहीतेने पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवला आणि तीन मुलांची हत्या करुन फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चारही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपी महिलेचाही तपास केला जात आहे. तसेच याप्रकरणी […]

अधिक वाचा...

जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर…

जालनाः जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जालना प्रकरणात ही पाहिली कारवाई समजली जात आहे. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार […]

अधिक वाचा...

शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…

हिंगोली : मोटारीला झालेल्या अपघातात शिक्षक पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील शिवनी फाट्याजवळ आज (रविवार) एक कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर कार तीन-चार पलटी घेत रस्त्याच्या बाजूला […]

अधिक वाचा...

संतापजनक! दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; ओठ कापले अन्…

नवी दिल्ली: एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना राजधानीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे या वृद्ध महिलेला मोठ्या प्रमाणात मारहाण करून तिचे ओठ ब्लेडने कापण्यात आले असून, गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेअंतर्गत दिल्ली महिला आयोगाने शहर पोलिसांना नोटीस पाठवली आहे. संबंधित घटना दिल्लीतील […]

अधिक वाचा...

लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेल्या युवकाला पकडण्यात आले आहे. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला तो सुरक्षा पासशिवाय प्रवेश करून सहभागी झाला होता आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याने फोटोही काढल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (MI) दक्षिण कमांडकडून मिळालेल्या माहितीवरून, नीरज विक्रम विश्वकर्मा (वय 20, रा. उत्तर प्रदेश) […]

अधिक वाचा...

गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…

पुणे: नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर चर्चांना उधाण आले होते. यानंतर गौतमीने वडिलांची दखल घेतली आहे. माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन, असे ती म्हणाली आहे. रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून […]

अधिक वाचा...

पत्नीची हत्या केली अन् नवऱ्याला आला हृदयविकाराचा झटका…

ठाणे : एका व्यक्तीने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर आरोपी नवऱ्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना कळवा येथे घडली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी राहणारे थेट साळवी यांच्या घराकडे धावले होते. पण, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. दिलीप साळवी आणि त्यांची पत्नी प्रमिला साळवी अशी मृतांची नावे आहेत. कुंभार आळी परिसरातील नागरिक साळवी यांच्या घरी […]

अधिक वाचा...

मणिपूरची पुनरावृत्ती! गर्भवती महिलेला विवस्त्र करून काढली धिंड; Video Viral…

जयपूर (राजस्थान): मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेने देश हादरला होता. पण, याच घटनेची राजस्थानमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. प्रतापगड जिल्ह्यात एका महिलेला मारहाण करून विवस्त्र केले. पीडित महिला गर्भवती असून, ती जीवाच्या आकांताने रडत होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाडी गावातील […]

अधिक वाचा...

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

कोल्हापूर : शिरोली येथे अल्पवयीन प्रेमीयुगुलाने व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवत गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. “ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायलाही तयार व्हा, अन्यथा प्रेम करु नका, प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत दोघांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेला युवक (वय १८) मुस्लीम तर युवती (वय १६) हिंदू […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!