मणिपूरची पुनरावृत्ती! गर्भवती महिलेला विवस्त्र करून काढली धिंड; Video Viral…

जयपूर (राजस्थान): मणिपूरमधील महिला अत्याचाराच्या घटनेने देश हादरला होता. पण, याच घटनेची राजस्थानमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. प्रतापगड जिल्ह्यात एका महिलेला मारहाण करून विवस्त्र केले. पीडित महिला गर्भवती असून, ती जीवाच्या आकांताने रडत होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने देशात संतापाची लाट उसळली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाडी गावातील एका 21 वर्षीय महिलेला तिचा नवरा आणि नातेवाईकांनी विवस्त्र करून तिची गावातून धींड काढली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी महिलेच्या नवऱ्यासह अन्य तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस महासंचलकाचे उमेश मिश्रा यांनी घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘एका महिलेला मारहाण करून विवस्त्र केल्याचा एक व्हिडीओ मीडियावर व्हायरल होत आहे. सुसंस्कृत समाजात अशा घटनांना स्थान नाही. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असून, हे प्रकरण फास्ट्र ट्रॅक कोर्टात चालवण्यात येणार आहे.’

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सरकरवर टीका करताना म्हटले आहे की, ‘गर्भवती महिलेचा विवस्त्र अवस्थेमधील धींड काढलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र, प्रशासनाला याबाबत कोणतीच माहिती नव्हती. या घटनेने राजस्थाची मान शरमेने झुकली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर शेअर न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘

मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…

भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…

प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…

मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!