Video: इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे: अब्दुल सत्तार

छत्रपती संभाजीनगर : शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्ताने नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे बुधवारी (ता. ३) सिल्लोड येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही युवकांनी हुल्लडबाजी केल्यामुळे संतापलेल्या अब्दुल सत्तार यांनी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. शिवाय, कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्या लोकांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबर मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून, पन्नास हजार […]

अधिक वाचा...

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली…

सोलापूरः नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सोलापूरमधील एका स्थानिक डिजिटल वृत्तवाहिनीच्यावतीने “डिस्को दांडिया” आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गौतमी पाटील येणार होती. मात्र, या काळात नवरात्रमुळे पोलिसांकडील मनुष्यबळ बंदोबस्तसाठी वापरले जात असल्याने, गौतमीच्या कार्यक्रमात पोलीस बंदोबस्त देणं शक्य नसल्याने […]

अधिक वाचा...

गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमात शिरला साप अन्…

मुंबईः नवी मुंबईतील कामोठे मानसरोवर परिसरात लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण, या कार्यक्रमादरम्यान साप शिरल्याचे समजल्यानंतर प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान, एका सर्पमित्राने तो साप पकडल्यामुळे गोंधळ शांत झाला. एका व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा आणि चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. पण, […]

अधिक वाचा...

गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल…

अहमदनगर: नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यावर अहमदनगर मधील तोफखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल अशा प्रकारे कार्यक्रम घेतल्याबद्दल नगरमधील गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर शहरातील पाईपलाईन रोडवर गुरूवारी (ता. २८) सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळ […]

अधिक वाचा...

गौतमी पाटील हिच्या वडिलांचे उपचारादरम्यान निधन…

पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वडिलांचे उपचारादरम्यान आज (सोमवार) निधन झाले. रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटील हिच्या वडिलांचे नाव आहे. गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्यानंतर गौतमी पाटील हिने वडिलांची जबाबदारी घेत त्यांना उपचारासाठी पुण्यात […]

अधिक वाचा...

गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…

पुणे: नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर चर्चांना उधाण आले होते. यानंतर गौतमीने वडिलांची दखल घेतली आहे. माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन, असे ती म्हणाली आहे. रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून […]

अधिक वाचा...

… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील नागापूर परिसरामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ उडाला. हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटील हिने अर्ध्यावरच कार्यक्रम बंद केला. आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणं बंद करेन, असे गौतमी पाटील हिने म्हटले आहे. नागापूर परिसरामध्ये गौतमी पाटील हिचा नृत्याचा मंगळवारी (ता. १) कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना […]

अधिक वाचा...

गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…

मुंबई : नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपून ठेवल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. विरारमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या गौतमीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तिने आडनावावरून वाद झालेल्या विषयावर भाष्य केले. गौतमी म्हणाली, ‘मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!