इंटरशिप करत असलेल्या डॉक्टरने घेतला जगाचा निरोप…
गोंदिया : शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टर भूषण विशाल वाढोणकर (वय २४) याने वस्तीगृहातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करत असलेला भूषण विशाल वाढोणकर (वय 24 वर्ष, रेल्वे चांदूर अमरावती जिल्हा येथे राहणारा) हा विद्यार्थी गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या […]
अधिक वाचा...दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
पुणे: दिशा राजू भोईटे (वय २१, रा. घाणेगाव, ता. पारनेर, जि. अहमदनगर) हिचे मंगळवारी (ता. २९) निधन झाले. तिच्या मृत्यूबाबत चौकशी करण्याची मागणी तिच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिशा भोईटे हिला ताप येत असल्यामुळे पारनेर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण, चार दिवस उपचार केल्यानंतरही तिच्या प्रकृतीत कोणतीच सुधारणा होत नव्हती. यामुळे पुढील […]
अधिक वाचा...मला माझीच लाज वाटते; गुड बाय साकिब; माझं तुझ्यावर प्रेम आहे…
लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमध्ये युवकासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पिंकी गुप्ता या युवतीचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. युवतीच्या कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस ठाण्यासमोर मृतदेह ठेवत कुटुंबीयांनी आंदोलन केले. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी युवकाला ताब्यात घेतले आहे. पिंकी गुप्ता ही एका जिममध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. तिथेच साकिब या युवकासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले […]
अधिक वाचा...मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…
मुंबई : पवई परिसरात रूपल ओगरे (वय 23) या एअर होस्टेसची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पवई पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून, इमारतीत साफसफाईचे काम करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे. मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रूपल ओगरे ही एअर होस्टेस राहत होती. राहत्या घरी मध्यरात्री […]
अधिक वाचा...Video: आंतरराष्ट्रीय खटले गाजवणारे हरीश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर…
नवी दिल्लीः देशाचे माजी सॉलिसिटर जनरल आणि प्रसिद्ध वकील हरीश साळवे (वय ६८) तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये हरिश साळवे यांनी दुसऱ्यांदा आपली लग्नगाठ बांधली होती. हरीश साळवे यांनी नुकतेच त्रिना (मूळ रा. ब्रिटन) यांच्यासोबत थाटामाटात लग्न केले आहे. यापूर्वी, मीनाक्षी (पहिली पत्नी) आणि कॅरोलिन ब्रॉसार्ड (2020) यांच्याशी त्यांनी विवाह केला होता. साळवे […]
अधिक वाचा...येरवडा तपास पथकाने चोरी करणाऱ्यास २४ तासात केले जेरबंद…
पुणे (संदीप कद्रे): घरामध्ये चोरी करणाऱ्या आरोपीस येरवडा तपास पथकाने २४ तासात जेरबंद केले आहे. येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. येरवडा भागात ३१/०८/२०२३ रोजी पहाटेचे सुमारास फिर्यादी रात्रीचे वेळी घरामध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात आरोपीने घराचे दरवाजाची कडी उचकटून आतमध्ये प्रवेश करुन घरातील ९८५० रुपये […]
अधिक वाचा...बस किस्मतने साथ नही दिया साहब, वरना दिल तो हमारा भी पागल था…
बीड: गेवराई तालुक्यातील कोपरा गावातील एका युवकाने धमक्या व खोट्या तक्रारीला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रामेश्वर महादेव डरपे असे मृत युवकाचे नाव आहे. आत्महत्या करण्याअगोदर त्याने सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ‘बस किस्मतने साथ नही दिया साहब, वरना दिल तो हमारा भी पागल था. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…
जयपूर (राजस्थान): एका महिलेने आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला गळफास दिल्यानंतर स्वःताही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बांसवाडामध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. महिलेचा पती कामावरून घरी परतल्यानंतर घरातील दृश्य पाहून त्याला धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. हे […]
अधिक वाचा...ज्येष्ठ साहित्यिक श्रावण गिरी यांचा रस्ता ओलंडताना अपघाती मृत्यू…
बीडः ज्येष्ठ साहित्यिक आणि निवेदक असलेले प्राध्यापक श्रावण गिरी यांचा रस्ता ओलांडनाता एका ट्रॅव्हल्सखाली येऊन मृत्यू झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. श्रावण गिरी हे कर्जत येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रूजू होते. काही कामानिमित्त ते औरंगाबादला आले होते. काम आटोपून कर्जतला परतताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका ट्रॅव्हल्सच्या बसने त्यांना धडक दिली. […]
अधिक वाचा...जालना जिल्ह्याचे शैलेश बलकवडे नवे पोलिस अधीक्षक; पदभार स्वीकारला…
जालना: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी यापूर्वी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने […]
अधिक वाचा...
