लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर लष्करी अधिकारी म्हणून वावरत असलेल्या युवकाला पकडण्यात आले आहे. लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला तो सुरक्षा पासशिवाय प्रवेश करून सहभागी झाला होता आणि लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत त्याने फोटोही काढल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
भारतीय लष्कराच्या मिलिटरी इंटेलिजन्स (MI) दक्षिण कमांडकडून मिळालेल्या माहितीवरून, नीरज विक्रम विश्वकर्मा (वय 20, रा. उत्तर प्रदेश) याला शनिवारी (ता. २) रात्री रेल्वे संरक्षण दलाने पकडले आहे. विक्रम विश्वकर्मा याची तपासनी केली असता त्यांच्याकडे अनेक पुरावे सापडले आहेत. नीरज विश्वकर्मा याने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यादरम्यान नवी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याला भेट दिली होती. सर्वांनी लेफ्टनंट रँक असलेल्या एलिट पॅरा स्पेशल फोर्सेस (पॅरा एसएफ) सारखा लष्कराचा गणवेश परिधान केला होता. सशस्त्र दलाचा सेवारत सदस्य म्हणून उभा होता. या फोटोमुळे नवी दिल्लीतील एवढी सुरक्षा असलेल्या कार्यक्रमात तो पोहचला कसा?, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्याच्या मोबाईलची तपासनी केली असता त्यात काही संशयित फोटोदेखील सापडले आहे. या फोटोत तो लष्करी जवानांच्या सहवासात असल्याचे दिसून आले आहे. त्याच्याकडे बनावट कॅन्टीन कार्ड असल्याचे आढळून आले, जे विशेषत: सेवारत किंवा सेवानिवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांना देण्यात येते.
लष्कराशी संबंधित हे सगळे पुरावे त्यांच्याकडे आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. त्याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. हा एकटाच होता की यांचे काही साथीदार आहेत का? बनावट लष्करी अधिकारी म्हणून तो का वावरत आहे? आणि त्यांचा कोणत्या देशविरोधी संघटनेशी संबंध आहे का? याची सध्या चौकशी केली जात आहे. त्यामुळे या चौकशीसाठी त्याला पुणे पोलिसांकडे सोपवण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…
कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…
जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…