पत्नीची हत्या केली अन् नवऱ्याला आला हृदयविकाराचा झटका…
ठाणे : एका व्यक्तीने पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर आरोपी नवऱ्याचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना कळवा येथे घडली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारी राहणारे थेट साळवी यांच्या घराकडे धावले होते. पण, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
दिलीप साळवी आणि त्यांची पत्नी प्रमिला साळवी अशी मृतांची नावे आहेत. कुंभार आळी परिसरातील नागरिक साळवी यांच्या घरी पोहोचले असता त्यांना दिलीप साळवी आणि त्यांची पत्नी प्रमिला साळवी हे दोघे मृतावस्थेत आढळले. दिलीप साळवी यांच्या पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. मृत दिलीप साळवी आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कळवा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पती दिलीप साळवी यांनी पत्नी प्रमिला हिच्यावर आधी दोन राऊंड गोळीबार करून तिची हत्या केली. त्यानंतर काही वेळातच दीपक साळवी यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. दिलीप साळवी यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचं लग्न झालं आहे. याशिवाय मृत दिलीप साळवी हे राष्ट्रवादीचे माजी नगर सेवक मिलिंद साळवी यांचे भाऊ आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
पतीची अवस्था पाहून पत्नीला बसला मोठा धक्का…
धक्कादायक! नवरा यूट्यूब पाहून करत होता पत्नीची घरीच प्रसूती अन् पुढे…
धक्कादायक! पोलिस पत्नीसह दीड वर्षाच्या चिमुकलीचा चाकूने भोसकून केला खून…
Video: पत्नीला धक्का लागला म्हणून मारहाण; युवक रुळावर पडला अन् क्षणात…
पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…