पुणे शहरात ऐन दिवाळीत रक्तरंजित थरार! ‘लाल्या’ला जागीच संपवलं…

पुणे: पुणे शहरातील कोथरुड परिसरात ऐन दिवाळीत एक रक्तरंजित घटना घडली आहे. सुतारदरा भागात पूर्ववैमनस्यातून एका युवकावर टोळक्याने धारदार शस्त्राने आणि लाकडी दांडक्याने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केली. प्रकाश येवले उर्फ ‘लाल्या’ (वय २७) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत प्रकाश येवले याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असून तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. काही दिवसांपूर्वीच सुतारदरा परिसरातील एका स्थानिक मंडळातील तरुणांसोबत त्याचा तीव्र वाद झाला होता. याच जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हा कट रचण्यात आला. शनिवारी (ता. ७) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास प्रकाश येवले हा सुतारदरा भागातून जात असताना ३ ते ४ तरुणांच्या टोळक्याने त्याला गाठले आणि अचानक रस्त्यात अडवले. काही समजण्याच्या आतच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रे आणि लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यात आणि पाठीवर वार केले. हल्ल्यानंतर मारेकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळावरून पोबारा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, हल्ल्याची ही घटना घडल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लाल्याला स्थानिक नागरिकांनी तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची चक्रे हलवली. पोलिसांनी संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न केली असून, त्यांना लवकरात लवकर बेड्या ठोकण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. सणासुदीच्या काळात घडलेल्या या हत्येमुळे कोथरूड परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! व्हॉट्सऍप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या…

पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…

पुणे! वकील पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून महिला सेक्रेटरीची हत्या…

पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या…

पुणे! गुंड निलेश घायवळ टोळीतील टोळक्याने केले युवकावर सपासप वार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!