गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…
पुणे: नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर चर्चांना उधाण आले होते. यानंतर गौतमीने वडिलांची दखल घेतली आहे. माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य तेवढे मी नक्की करेन, असे ती म्हणाली आहे.
रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून सध्या त्यांच्यावर धुळे शहरातील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांची बातमी प्रसिद्ध होताच गौतमी पाटील हिने याची दखल घेतली आहे. आपल्या मावशीला या गोष्टीची कल्पना दिली व मावशीला सांगितले की, वडिलांची तब्येत कशी आहे याची तू विचारणा कर व त्यांना पुढील उपचारासाठी माझ्याकडे पुण्याला घेऊन ये. तिच्या मावशीने लागलीच धुळे गाठले व या ठिकाणी त्यांच्या मावशी व धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेली.
गौतमी पाटील म्हणाली, ‘माझे वडील धुळ्यात एका रुग्णालयात दाखल असल्याची बातमी पाहिली त्यानंतर मी माझ्या मावशीला या संदर्भात सांगितले की वडिलांची तब्येत आता कशी आहे व त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन ये. वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेल. पुढील उपचार त्यांचे मी पुण्यालाच करेल. धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांनी मदतीचा हात दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत.’
एका मुलाखतीमध्ये गौतमीने आपल्या वडिलांबाबत सांगितले आहे की, ‘तिच्या वडिलांनी आपल्याला चांगली नोकरी, घर असल्याचं सांगून तिच्या आईसोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या पहिल्याच दिवशी ते घरी दारु पिऊन आले होते. त्यांनंतर सतत त्यांचे दारु पिऊन येणे, मारहाण करणं सुरु झाले होते. गौतमीची आई गरोदर असतानाही विचारपूस करत नव्हते. सततच्या मारहाणीला कंटाळून गौतमीच्या आजोबांनी तिच्या आईला माहेरी परत घेऊन आले होते.’
‘माहेरीच गौतमीच्या आईचे बाळांतपण झाले. आजोबांनीच गौतमी आणि तिच्या आईचा सांभाळ केला. त्यामुळे गौतमीने कधीही आपल्या वडिलांचे तोंडदेखील पाहिले नव्हते. परंतु, आपल्या बहिणीचा संसार पुन्हा रुळावर यावा यासाठी गौतमीच्या मामांनी प्रयत्न केले. आणि त्यांनी तिच्या वडिलांना बोलावून घेतले. त्यावेळी गौतमी आठवीत होती. गौतमी पाटीलने पहिल्यांदा आठवीत असताना आपल्या वडिलांना पाहिले होते. पहिल्यांदाच पाहिल्याने तिला हेच आपले वडील असल्याचे समजले नाही. परंतु, मामा आणि आजोबांनी हे तुझे बाबा असल्याचं सांगत ओळख करुन दिली होती. हा प्रसंग मुलाखतीत सांगताना गौतमी भावुक झाली होती.’
गौतमीने पुढे सांगितले की, ‘माझे बाबा आमच्यासोबत राहायला तयार झाले. पण, सोबत राहात असताना पुन्हा त्यांनी शिवीगाळ करणे, मारहाण करणे सुरु केले होते. त्यांचं घराकडे अजिबात लक्ष नव्हते. त्यांच्या या वाईट वागणुकीला कंटाळून घर मालकानेसुद्धा खोली सोडायला करायला सांगितली. अशाप्रकारे फक्त वर्षभरच वडील आमच्यासोबत राहिले. याकाळात आपण आणि आई छोटेमोठे काम करुन पन्नास रुपये मिळवत असे. पुढे आईचा अपघात झाला आणि ते पैसे पुरेनासे झाले. त्यामुळे गौतमीने हा मार्ग धरला.’
… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील
गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…