धक्कादायक! प्रेमसंबंधातून नवऱ्यासह तीन मुलांची हत्या…
चंदीगड (हरियाणा): प्रेमसंबंधातून एका विवाहीतेने पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह झाडाला लटकवला आणि तीन मुलांची हत्या करुन फरार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या चारही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. आरोपी महिलेचाही तपास केला जात आहे. तसेच याप्रकरणी नातेवाईकांचीही चौकशी केली जात आहे.’
नूह जिल्ह्यात रोजकामेव येथे ही घटना घडली आहे. जीत सिंह उर्फ जीतन (वय 34), खिलाडी (वय 12), मुलगी राधिका आणि मुलगा प्रियांशू (वय 7) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, फरार झालेल्या महिलेचे नाव मीना आहे. शेजाऱ्यांना विचारपूस केली असता महिलेच्या चारित्र्यावर जीतनला संशय होता. त्यावरुन दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. कायम ती दोन-चार दिवस बेपत्ता असायची. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असल्याची शक्यता शेजाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…
प्रेमात अडसर ठरत असल्याने चिमुकल्याचा खून करून मृतदेह अक्षरशः फेकला…
प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…
बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…
प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर दिला विजेचा शॉक अन्…