
शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…
हिंगोली : मोटारीला झालेल्या अपघातात शिक्षक पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील शिवनी फाट्याजवळ आज (रविवार) एक कार डिव्हायडरला जाऊन धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर कार तीन-चार पलटी घेत रस्त्याच्या बाजूला जाऊन पडली. या अपघातामध्ये कारमध्ये असलेले शिक्षक पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तर कार चालवत असलेला त्यांच्या मुलाला गंभीर मार लागला आहे. जयप्रकाश कावरखे आणि मंजुषा कावरखे असे मृत्युमुखी पडलेल्या शिक्षक पती पत्नीचे नाव आहे. तर पराग कावरखे असे जखमी मुलाचे नाव आहे.
नांदेडहून कळमनुरीच्या दिशेने जाणारी या कारचा वेग अधिक होता. त्यामुळे नियंत्रण सुटल्यावर ती थेट डिव्हायडरवर जाऊन धडकली. अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त कारने तीन-चार पलटी घेतली. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी आणि इतर वाहनधारकांनी तात्काळ धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. तसेच, जखमी तरुणाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. तसेच पोलिसांना देखील याबाबातची माहिती दिली.
Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…
नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…
बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…
लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…
वाहतुकीचे नियम मोडल्यास तीन महिने लायसन्स रद्द अन्…