‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…
कोल्हापूर : शिरोली येथे अल्पवयीन प्रेमीयुगुलाने व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवत गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
“ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायलाही तयार व्हा, अन्यथा प्रेम करु नका, प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत दोघांनी आत्महत्या केली. आत्महत्या केलेला युवक (वय १८) मुस्लीम तर युवती (वय १६) हिंदू आहे.
दरम्यान, एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड, ता. चंदगड, जि. कोल्हापूर) या युवकाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.
विठ्ठल याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. “त्या मुलीने माझा केवळ वापर केला. निर्भया पथकाची भीती दाखवून त्यांनी माझ्याकडून तिला परत मेसेज न करण्याचे जबरदस्तीने लिहून घेतले. तिला मी विसरु शकत नसल्याने शेवटचा हा पर्याय निवडला. आय एम सॉरी,” असे त्याने चिठ्ठीत लिहिले होते.
एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…
प्रेम प्रकरणातून नदीत उडी मारलेल्या युवकाचा चौथ्या दिवशी सापडला मृतदेह…
हृदयद्रावक! पाच महिन्यांपूर्वी विवाह केलेल्या वनरक्षकाने घेतला जगाचा निरोप…
प्रेमात अडसर ठरत असल्याने चिमुकल्याचा खून करून मृतदेह अक्षरशः फेकला…
बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…