समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील वैजापूर येथे दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू असून, २३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झालाआहे.

समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ रात्री 1 ते दीड वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर 14 जण घाटीत उपचारासाठी दाखल आहेत. तर, आणखी 3 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. अपघाताची माहिती मिळताच वैजापूरसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत केली. यानंतर अपघातात जखमींना रुग्णवाहिकेतून शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. जखमींमधील 3-4 जणांची प्रकृती जास्त गंभीर आहे. या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या ट्रॅव्हल्समध्ये एकूण 35 जण प्रवास करत होते.

ट्रॅव्हल्स बसमधील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. यात ट्रॅव्हल्स बसने ट्रकला पाठी मागून जोरात धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे…
तनुश्री लखन सोळसे (०५), संगीता विलास अस्वले (४०), पंजाबी रमेश जगताप (३८), रतन जमदाडे(४५), काजल सोळसे (३२), रजनी गौतम तपास (३२), हौसाबाई आनंदा शिससाट (७०), झुंबर काशिनाथ गांगुर्डे (५८), अमोल गांगुर्डे (१८), सारिका गांगुर्डे (४०), मिलिंद पगारे (५०), दीपक केकाने (४७).

जखमींची नावे पुढीलप्रमाणे…
पुजा सिंदीप अस्वले (३५), वैष्णवी सिंदीप अस्वले (१२), ज्योती हदपक के काणे (३५), कमलेश दगु म्हस्के (३२), सिंदीप रघुनाथ अस्वले (३८), युवराज पवलास साबळे (१८), कमलबाई छबु मस्के (७७), संगीता दगडु म्हस्के(६०), दगु सखदेव म्हस्के (५०), लखन सोळसे (२८), गिरजेश्वरी अस्वले (१०), शांताबाई मस्के (४०), अनिल साबळे (३२), तन्मय कांबळे (८), सोनाली त्रिभुवन (२५), श्रीहरी केकाणे (१२), सम्राट केकाणे (६), गौतम तपासे (३८), कार्तिक सोळशे (५), धनश्री सोळसे (८), संदेश अस्वले (१२), प्रकाश गांगुर्डे (२४), शंकर (३). या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

समृद्धी महामार्ग पुढील काही दिवसांसाठी राहणार बंद; कारण…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!