संतापजनक! दिल्लीत 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; ओठ कापले अन्…

नवी दिल्ली: एका 85 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना राजधानीत घडली आहे. धक्कादायक म्हणजे या वृद्ध महिलेला मोठ्या प्रमाणात मारहाण करून तिचे ओठ ब्लेडने कापण्यात आले असून, गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेअंतर्गत दिल्ली महिला आयोगाने शहर पोलिसांना नोटीस पाठवली आहे.

संबंधित घटना दिल्लीतील शकूरपुर या भागात बलात्काराची घटना घडली असून, पोलिसांनी आरोपी आकाश याला अटक केली आहे. कलम 376 (बलात्कार) अंतर्गत सुभाष प्लेस पोलिस ठाण्यात आरोपीवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलिस करत आहेत. तसेच ही घटना घडली त्यावेळी आरोपी दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे.

या घटनेची माहिती समोर येताच दिल्ली महिला आयोगाने पीडित वृद्ध महिलेची तात्काळ भेट घेतली. तसेच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर सोशल मिडीयावर ट्विट केले आहे ज्यात त्यांनी लिहिले आहे की, “दिल्लीत मानवतेचा ऱ्हास झाला आहे. त्या वृद्ध महिलेची अवस्था पाहून मला मोठा धक्का बसला.”

दिल्लीच्या उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्तांना पाठवलेल्या नोटीसमध्ये आयोगाने म्हटले आहे की, ‘एका झोपडपट्टीत एकटी राहणाऱ्या 85 वर्षीय पीडितेने असा आरोप केला आहे की, पहाटे 4 वाजता एका व्यक्तीने तिच्या झोपडपट्टीत घुसून तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला सुरूवातीस मारहाण केली, नंतर ब्लेडने तिचे ओठ कापले आणि तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. वृद्ध महिलेच्या संपूर्ण शरीरावर आणि गुप्तांगावरही जखमा आढळून आले असल्याचे महिला आयोगाकडून सांगण्यात येत आहे.’

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…

भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…

प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…

धक्कादायक! सावकाराने पतीसमोरच पत्नीवर केला बलात्कार…

मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!