लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड केली आहे. सहा पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई कार्तीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांनी घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेने त्या अनुषंगाने सहा पोलिस अधीक्षक लोणावळा विभाग लोणावळा सत्यसाई कार्तीक यांनी उपविभागीय पोलिस अधीकारी कार्यालयात डीबी पथकाची मिटींग घेतली आणि घरफोडी चोरी उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या आहेत.
१७/११/२०२३ रोजी रात्री १०:०० वा. ते १८/११/२०२३ रोजी सकाळी ०७:३० वा चे दरम्यान लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन पोलिस स्टेशन हददीमध्ये मौजे भाजे ता मावळ जि पुणे येथील ओमसाई नावाचे गॅरेज मधुन मोटार सायकलचे ब्लॉक पिस्टन, लायनर, चैन किट, फोर व्हिलरचे क्लच प्लेट, ब्रेक डिक्स असा एकुण १६,०५०/- रूपये किंमतीचा मुददेमाल घरफोडी चोरी करून चोरून नेलेबाबत २३/११/२०२३ रोजी लोणावळा ग्रामीण पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनकडील पोलिस निरीक्षक किशोर यांचे मार्गदर्शनाखाली पोसई भारत भोसले, पोहवा नितीन कदम, पोकॉ केतन तळपे, राहुल धुमाळ खैरे, निखील पंडीत, होमगार्ड अमित भदोरिया या पथकाने मौजे भाजे, मळवली, कार्ला या भागात गस्त घालुन तसेच बातमीदारामार्फत माहिती घेवुन संशयीत संदीप भानुदास जाधव (वय ४१, रा. लोणावळा रेल्वे स्टेशनजवळ लोणावळा ता मावळ जि पुणे मुळ रा. टाकळकरवाडी ता खेड जि पुणे) यास ताब्यात घेतले. त्याचेकडे विचारपुस करता त्याने गुन्हयाची कबुली दिली. त्यास गुन्हयाचेकामी अटक करण्यात आले आहे. न्यायालयाने ०३ दिवसांची पोलिस कस्टडी दिलेली असुन कस्टडी दरम्यान गुन्हयामध्ये गेलेला १६,०५०/- रू. किं.चा मुददेमाल हा हस्तगत करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोहवा नितीन कदम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पुणे ग्रामीण अंकीत गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश घटटे पुणे विभाग व सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, पोसई भारत भोसले, पोहवा नितीन कदम, पोकॉ केतन तळपे, राहुल खैरे, निखील पंडीत, होमगार्ड अमित भदोरिया यांनी केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी माहिती दिली आहे.
लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…
लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…
लोणावळा येथे संकल्प नशामुक्ती अंतर्गत नशेखोरांना न्यायालयाने ठोठावला दंड…
लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!