नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…

मुंबई: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी (ता. २) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयात करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. एनडी स्टुडिओतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार […]

अधिक वाचा...

मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (वय ५८) यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नितिन देसाई […]

अधिक वाचा...

… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यातील नागापूर परिसरामध्ये नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ उडाला. हुल्लडबाजांनी गोंधळ घातल्याने गौतमी पाटील हिने अर्ध्यावरच कार्यक्रम बंद केला. आयोजकांकडून कार्यक्रमासाठी व्यवस्थित बंदोबस्त नसेल तर कार्यक्रम करणं बंद करेन, असे गौतमी पाटील हिने म्हटले आहे. नागापूर परिसरामध्ये गौतमी पाटील हिचा नृत्याचा मंगळवारी (ता. १) कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम सुरू असताना […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात विहिरीत कोसळला मातीचा ढिगाळा; चौघे अडकले…

पुणे : इंदापूर तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे विहिरीची रिंग आणि मातीचा ढिगारा कोसळला असून, या ढिगाऱ्याखाली चार जण अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य केले जात आहे. म्हसोबावाडी गावात विहिरीला रिंग टाकण्याचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक रिंग मारलेला स्लॅबचा भाग आणि मातीचा ढिगारा विहिरीत कोसळला. यामध्ये […]

अधिक वाचा...

बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह…

रत्नागिरी : दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेली नीलिमा सुधाकर चव्हाण (वय २४) ही युवती बेपत्ता होती. पण, दाभोळ समुद्रकिनारी नीलिमा हिचा मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नीलिमा हिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर समजणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दापोली येथून निघालेली […]

अधिक वाचा...

लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…

लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या (गोवंश) बैलांची अवैध वाहतूक करीत असलेला आयशर ताब्यात घेण्यात आला असून, 15 बैलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक लातूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा 30/07/2023 रोजी रात्री शोध घेत होते. पथक रात्री 2 वाजण्याचे सुमारास पोलिस ठाणे अहमदपूर येथे पोचले […]

अधिक वाचा...

पुणे-नगर महामार्गावर PMPMLच्या दोन बस समोरासमोर धडकल्या; प्रवासी जखमी…

पुणे : पुणे-नगर महामार्गावर पीएमपीएमएलच्या दोन बसेसची समोरासमोर धडक झाली. या अपघातात २९ प्रवासी जखमी झाले आहेत. चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही बसेसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, वाघोली आगारातील कात्रज ते वाघोली बस वाघोलीच्या […]

अधिक वाचा...

कौतुकास्पद! मुंढवा पोलिसांनी वाचवला आत्महत्या करणाऱ्या युवकाचा जीव…

पुणे: आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय तरुणास वाचविण्यात मुंढवा पोलिस स्टेशन टिमला यश आले आहे. नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करुन आभार मानले. मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील बिट मार्शल ड्युटी कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार महेश पाठक, पो.हवा.मेमाणे यांना नियंत्रण कक्ष, पुणे शहर कडून सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे येथे एक मुलगा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत […]

अधिक वाचा...

डॉ. आदिनाथ पाटीलने स्वतःला इंजेक्शन घेऊन घेतला जगाचा निरोप…

मुंबई : नीट पीजी परीक्षेचा टॉप असलेल्या आणि केईएममध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने स्वत: ला इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली आहे. आदित्यनाथ पाटील असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शिवडीतील टीबी रुग्णालयात ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. आदित्यनाथ पाटील (मूळ रा. जळगाव) हा केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टर होता. मेडिसिन विभागात प्रथम वर्षाचे पदव्युत्तरचा विद्यार्थी […]

अधिक वाचा...

श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…

चित्तूर (आंध्र प्रदेश) : देशभर सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर, भारतीय महिला अंजू यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. श्रीलंकेतल्या एका महिलेचे भारतीय व्यक्तीवर फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. भारतात येऊन तिने युवकासोबत लग्नही केले आहे. चित्तूर जिल्ह्याच्या व्यंकटगिरीकोटा मंडळातल्या अरिमाकुलापल्ले गावात लक्ष्मण राहतो. फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख कोलंबो (श्रीलंका) शहरातल्या विघ्नेश्वरी नावाच्या महिलेशी झाली. पुढे […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!