लग्नाळू युवकाचे एका मुलीच्या आईशी लावून दिलं लग्न अन् पुढे…

बीड : बीड शहरातील एका युवकाचे एका मुलीच्या आईशी लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय, एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

कर्नाटक राज्यातील बिदर येथील महिलेने लग्नाळू युवकासोबत बनावट विवाह केला. एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.

एका युवकाला विवाह होण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे त्याने व कुटुंबीयांनी लग्न जमवण्याचे काम करणाऱ्या राजाभाऊ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी युवकासह त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन कर्नाटकातील बिदर येथे नेले. तिथे सुनीता नावाच्या महिलेची भेट घालून दिली व तिथेच दिव्या विजयकुमार खानापुरे ही मुलगी त्यांना दाखवली. साडेतीन लाख रुपये मुलीच्या कुटुंबीयांना दिले तरच विवाह होईल, असे राजाभाऊ कुलकर्णी यांनी सांगितले. त्यानंतर 3 लाख 30 हजार रुपयांत हा व्यवहार ठरला. यापैकी 2 लाख 80 हजार रुपये कुलकर्णी यांच्याकडे दिले होते, तर 50 हजार रुपये हे लग्नाच्या एक महिन्यानंतर देण्याचे ठरले. 17 सप्टेंबर रोजी बीडमध्ये विवाह झाला.

विवाहानतर मुलाच्या कुटुंबीयांनी नवरीकडे चौकशी केल्यानंतर धक्काच बसला. तिने सांगितले, यापूर्वी दोन लग्ने झालेली असून दुसऱ्या पतीपासून मुलगी आहे. सुनीता या महिलेच्या सांगण्यावरून हा विवाह केला असून, महिनाभरात पळून येण्यास सांगितले होते. दरम्यान, पोलिसांत दिव्या विजयकुमार खानापुरे, सुनीता (दोघी रा. बिदर, कर्नाटक), राजाभाऊ कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने युवकाने उचलले धक्कादायक पाऊल…

नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!