‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून मीरा बोरवणकर यांचे ‘दादां’वर गंभीर आरोप…

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकांत गंभीर आरोप केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता मीरा बोरवणकर यांनी गंभीर आरोपही केला आहे. पोलिसांच्या घरासाठीच्या जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय तत्कालीन पालकमंत्री दादांनी घेतला होता असे म्हटले आहे. पुस्तकात दादा असा उल्लेख करण्यात आला आहे.

येरवडा कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरला देण्याचा आग्रह अजित पवार यांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असताना त्यांनी 2010 मधील प्रकरणाचा उल्लेख केला आहे. कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. हे लिहितांना त्यांनी अजित पवार यांचे थेट नाव घेतले नाही. परंतु, जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’ असे त्यात म्हटले आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय होणार होते, असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे.

आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्याचबरोबर आसपासच्या पोलिस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटा. याचवेळी विषय येरवडा पोलिस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील असल्याचेही त्यांनी मला सांगितले. विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली.

पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलिस स्टेशन परिसराचा नकाशा होते. या जागेचा लिलाव झाल्याचे त्यांनी मला सांगितले. जास्त बोली लावणाऱ्यांसोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर पालकमंत्र्यांना मी सांगितले की, ‘येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात इतकी मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही आणि पोलिस वसाहतीसाठी आपल्याला जागेची गरज आहे. नुकताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेने बघितले जाईल. परंतु, त्या मंत्र्याने माझे काहीही ऐकले नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला, असे मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटले आहे. येरवडा कारागृहाशेजारील पोलिसांची तीन एकर जमीन खासगी बिल्डरला दिल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!