समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर रविवारी (ता. १५) झालेल्या भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण गंभीर जखमी झाले होते. आरटीओ अधिकारी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर दोन आरटीओ अधिकारी आणि चालकावर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर या प्रकरणात तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रदीप राठोड आणि नितीनकुमार गोणारकर अशी अटक करण्यात आलेल्या आरटीओ अधिकाऱ्यांची नावे आहेत. तर ब्रिजेश चंदेल असे चालकाचं नाव आहे. संबंधित आरटीओ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ भीषण रविवारी अपघात झाला. समोर उभ्या असलेल्या ट्रकला मागून मिनी ट्रॅव्हलने धडक दिली. या अपघातामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण गंभीर जखमी झाले. आरटीओची गाडी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी असा आरोप केला होता. या प्रकरणात आरटीओ अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली होती. रविवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणात दोन आरटीओ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

समृद्धी महामार्ग पुढील काही दिवसांसाठी राहणार बंद; कारण…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!