‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिच्या दांडियाचे पास अन् लाखो रुपयांची फसवणूक…

मुंबईः ‘गरबा क्वीन’ फाल्गुनी पाठक हिच्या दांडियाच्या पासेसचे आमिष दाखवून 156 युवकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. आरोपीने स्वस्तात पास देण्याचे आमिष दाखवून युवकांची फसवणूक केली प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बोरिवली (पश्चिम) येथील फाल्गुनी पाठक हिच्या कार्यक्रमाचा अधिकृत विक्रेता असल्याचा दावा करणारा विशाल शहा हा स्वस्तात पासेस देत असत्याची […]

अधिक वाचा...

भाजप नेत्याची घरात घुसून हत्या; पत्नीने केला संशय व्यक्त…

रांची (छत्तीसगड) : माजी आमदाराचा मुलगा आणि भाजप नेते चंद्र शेखर गिरी गोस्वामी यांची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना धमतरी येथे घडली आहे. मृत भाजप नेत्याच्या पत्नीने तिच्या दिरांवर या प्रकरणी संशय व्यक्त केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मरौद गावात आज (रविवार) सकाळी भाजप नेत्याची घरात घुसून हत्या करण्यात आली. भाजप […]

अधिक वाचा...

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

कराड (सातारा): पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड फाटा (ता. कराड) येथे उभे असलेल्या ट्रकला पाठीमागून चारचाकीने जोरात धडक दिली. या अपघातामध्ये पोलिस कर्मचारी भाऊ-बहिणीसह भाच्याचा जागीच मृत्यू झाला. तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. नितीन पवार (रा. कोल्हापूर) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांची बहीण मनीषा आप्पासाहेब जाधव आणि भाचा अभिषेक आप्पासाहेब […]

अधिक वाचा...

महिलेला खोटे दागिने गळ्यात घालणे पडले महागात…

जयपूर (राजस्थान): एका महिलेने आर्टिफिशियल (खोटे) दागिने गळ्यात घातले होते पण ते पाहून एका चोरट्याने ते दागिने लुटण्याच्या उद्देशाने महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिलवाडा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सदर पोलिस स्टेशन परिसरात महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह शुक्रवारी (ता. १३) दुपारी आढळून आला. यानंतर तिची ओळख पटली. […]

अधिक वाचा...

ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…

पुणे : अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा ससून रुग्णालयातू पळू गेला असून, पोलिस त्याच्या शोध घेत आहेत. ललित पाटील याला शोधण्याची जबाबदारी आता गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपवली आहे. बंडगार्डन पोलिस स्टेशनमध्ये ललित पाटील याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ललिता भाऊ भुषण आणि त्याचा साथीदार अभिषेक विलास बलकवडे […]

अधिक वाचा...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील वैजापूर येथे दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू असून, २३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झालाआहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ रात्री 1 ते दीड वाजेच्या […]

अधिक वाचा...

Video: इस्त्राईलच्या 13 सैनिकानी केली 250 जणांची सुटका, थरारक…

जेरुसलेमः इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या यु्द्धामध्ये दोन्हीकडचे हजारो नागरिक, सैनिक मारले जात आहेत. दरम्यान हमासच्या सैनिकांना संपवूनच युद्ध संपविण्याच्या पावित्र्यात इस्रायली सैनिक दिसत आहेत. इस्रायलच्या सशस्त्र दलांनी हमासने ताब्यात घेतलेल्या एका चेकपॉईंटवर पुन्हा ताबा मिळवला आणि 250 ओलिसांची सुटका केली. संबंधित घटनेचा थरारक व्हिडिओ इस्त्राईलने समोर आणला आहे. यामध्ये इस्राईलचे सैनिक हमासच्या सैनिकांना कशाप्रकारे […]

अधिक वाचा...

वैद्यकिय विक्री प्रतिनिधीची आत्महत्या; वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…

नाशिक : कंपनीच्या सेल प्रेशरच्या त्रासाला कंटाळून एका वैद्यकीय विक्री प्रतिनिधीने (एम.आर) राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको येथे घडली आहे. तुषार अशोक शिंपी (३२, रा. शुभम पार्क, सिडको) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तुषार अशोक शिंपी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात मॅनेजर देशपांडे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. […]

अधिक वाचा...

पती-पत्नीने जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठीत घेतले अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याच्या सततच्या दारू पिण्याच्या सवयीमुळे संतापलेल्या पत्नीने त्याला घाबरवण्यासाठी रेल्वे रुळ गाठला. नवराही तिची समजूत घालण्यासाठी तिच्या पाठीमागे गेला. दोघांनी जोरदार भांडणानंतर एकमेकांना प्रेमाने मिठी मारली आणि रेल्वेरुळावर झोकून दिले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. गोविंद सोनकर (वय 30) आणि त्याची पत्नी खुशबू सोनकर (वय 28) अशी मृतांची नावे आहे. वाराणसी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पुणे: पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बेकायदा बदल करून मोठ्या आवाजाने ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ‘बुलेट राजांवर’ वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांपासून बुलेटच्या सायलेन्सर आवाज काढणाऱ्यांची संख्या वाढली होती. पोलिसांनी त्याची दखळ घेतली आहे. पुणे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाजाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांना आवाज करणाऱ्या बुलेटवर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!