मुंबई-गोवा महामार्गावर मोटार अपघातात दोघांचा जागीच मृत्यू…

पनवेल: मुंबई-गोवा महामार्गावर देवीचं दर्शन घेऊन परतत असलेल्या भाविकांची गाडी नाल्यात कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

पेण तालुक्यातील प्रसिद्ध खरोशी येथील केळंबा देवीचे दर्शन करून येत असताना मुंबई-गोवा महामार्गावर चिंचवण गावाच्या हद्दीत ब्रीझा गाडीला अपघात झाला. गाडीवरचा ताबा सुटल्याने गाडी विरूद्ध दिशेला जावून खोल नाल्यात कोसळली. या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवी मुंबईतील सानपाडा येथे राहणारे पाच जण पेण येथील देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन येत असताना हा अपघात झाला आहे. जीवन पाटील आणि रमेश पाटील असे या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. पनवेल शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…

भीषण अपघात! रिक्षावर ट्रक उलटून चार जणांचा जागीच मृत्यू…

नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच मजुरांना चिरडले…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!