हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
पुणे: पुणे शहरातील विश्रांतवाडी चौकात ऑईलच्या टॅंकरचा धक्का लागून दुचाकीवरील जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलींची आई गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
साक्षी आणि श्रध्दा झा (वय साडेतीन वर्षे, रा.भोसरी) अशी मृत जुळ्या मुलींची नावे आहेत. त्यांची आई किरण झा (वय 38) अपघातात जखमी झाली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात टॅंकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कुमार झा (वय 40) हे आपल्या 3 वर्षांच्या जुळ्या मुली आणि पत्नीसह दुचाकीवरून जात असताना विश्रांतीवाडी चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबले होते. ते दोन्ही मुलींला घेऊन उपचारासाठी येरवड्यात आले होते. तेथून भोसरी येथे ऍक्टीवावारुन परत निघाले होते. सिग्नल सुटल्यावर शेजारील ऑईलच्या टॅंकरचा त्यांच्या गाडीला धक्का लागला. यामध्ये तिघीही गाडीवरुन खाली पडल्या. दोन्ही मुली टॅंकरखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. पेट्रोल टँकर चालकाला अटक करण्यात आली आहे.
विश्रांतवाडी चौकात धक्कादायक अपघात, ऑईल टॅंकरखाली चिरडून दोन जुळ्या मुलींचा जागीच मृत्यू – पहा Video.. pic.twitter.com/7Umw8Xnsdv
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) October 16, 2023
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…
महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पुणे-नगर महामार्गावर PMPMLच्या दोन बस समोरासमोर धडकल्या; प्रवासी जखमी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!