गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १७ जनावरांची केली सुटका…

गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): ट्रकमध्ये अवैधरीत्या निर्दयतेने बंदीस्त करून गोवंशीय जनावरांची वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमधून एकूण 17 गोवंशीय जनावरांची (म्हशी, रेडे) सुटका करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एकूण 18 लाख 40 हजार रुपयाचा मुददेमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांनी गोंदिया जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे हद्दितील अवैधरित्या चालणाऱ्या धंदयाचे समुळ उच्चाटन कव्हावे या करीता अवैध धंद्यावर प्रभावी धाडी टाकून अवैध धंद्यांवर आळा घालण्याकरीता जिल्हयातील सर्व पोलिस ठाणे प्रभारी,आणि पो.नि. स्था. गु. शा. यांना याबाबत निर्देशित केले होते. या अनुषंगाने पोलिस अधीक्षक निखील पिंगळे,अपर पोलिस अधीक्षक, कॅम्प देवरी अशोक बनकर यांच्या निर्देश सूचना, आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक, दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात संपुर्ण गोंदिया जिल्ह्यातील अवैधरीत्या चालणाऱ्या दारु, जुगार, अवैध जनावरे वाहतूक, धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.

दिनांक 17/08/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस पथक पो. ठाणे रावणवाडी परिसरात अवैध धंद्यांवर रेड, गुन्हेगार शोध, व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत होते. पथकास गुप्त बातमीदार कडून माहिती मिळाली की, चंगेरा गावाकडून तेढवा मार्गे जनावरे भरलेला ट्रक येत आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पो. स्टे. रावणवाडी परिसरातील मौजा- मंडीयाटोला चौक येथे नाकाबंदी लावली असताना रात्री 22.15 वा. च्या सुमारास मौजा तेढवा कडून येणारे एक ट्रक येताना दिसला. त्या ट्रकला थांबण्याचा इशारा केला असता चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक मागेच थांबवून रात्रीचा अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. त्या संशयित ट्रकच्या मागील डाल्याची पाहणी केली असता 9 म्हशी व 8 रेडे असे एकूण 17 जनावरे किंमत 3,40,000/- रू. अवैधरीत्या निर्दयतेने चाऱ्यापाण्याविना कोंबून बंदिस्त केलेल्या स्थिती आढळून आली.

ट्रक आणि जनावरे, असा एकूण किंमती 18 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेवून जप्त करण्यात आला. निर्दयतेने बंदिस्त 17 गोवंशीय जनावरे (म्हशी व रेडे) यांची सुटका करून सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारा- पाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता कोरणी येथील गौशाळेत दाखल करण्यात आलेली आहेत. सदर प्रकरणी फरार आरोपी चालक- मालक अजित हंसराज सहारे (रा. काटी, ता.जि. गोंदिया) याचेविरुध्द पोलिस ठाणे रावणवाडी येथे प्राण्यांना निर्दयतेने छळवनुक प्रति.अधि. सह कलम महा. पशु संवर्धन अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलिस ठाणे रावणवाडी पोलिस करीत आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी अशोक बनकर यांचे निर्देश सूचना प्रमाणे, आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांचे मार्गदर्शनात पोउपनि महेश विघ्ने, सहा.फौ. मधुकर कृपान, पोहवा. सोमेंद्रसिंह तुरकर, तुलशीदास लुटे, चापोहवा. लक्ष्मण बंजार, पो.शि. संतोष केदार यांनी केलेली आहे.

गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…

पुण्यात स्फोट करण्याचा कट; तिसऱ्या आरोपीला गोंदियातून अटक…

Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…

कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!