ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
पुणे : अमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवणाऱ्यापासून तयार झालेले पदार्थ विक्री करणाऱ्यांची साखळी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, या प्रकरणात आणखी सात आरोपींची नावे पुढे आली आहे. हे सातजण आणि ललित पाटीलसह पूर्वीच्या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडे या दोघांना न्यायालयात हजर केले. त्यावेळी दोघांच्या पोलिस कोठडीत 8 दिवस वाढ करण्याची मागणी सरकारी पक्षाने केली.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी 20 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत वाढ केली. समाधान बाबाजी कांबळे, शिवाजी शिंदे, जिशान इक्बाल शेख, राहुल पंडित, रोहितकुमार ऊर्फ अमितकुमार (सर्व रा. नाशिक), हरीश पंत, इम्रान शेख, गोलू (तिघेही रा. मुंबई) अशी या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी ललित पाटील व त्याचे साथीदार नाशिक येथील एमआयडीसीमध्ये ज्या कारखान्यात मेफेड्रान तयार करीत होते. तो कारखाना समाधान कांबळे याचा आहे. शिवाजी शिंदे हा मेफेड्रान तयार करण्यासाठी कच्चा माल पुरवीत. हरीश पंत, जिशान शेख आणि राहुल पंडित हे मेफेड्रॉन तयार करत.
इम्रान शेख आणि गोलू हे दोघे तयार झालेल्या अमली पदार्थांची विक्री करत. अटकेत असलेले आणि फरार असलेल्या आरोपींनी मेफेड्रान विक्रीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल केली असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? यासह तपासादरम्यान येणाऱ्या विविध मुद्यांची चौकशी करायची आहे. नव्याने निष्पन्न झालेल्यापैंकी जिशान शेख आणि शिवाजी शिंदे मुंबई पोलिसांच्या अटकेत आहेत.
पोलिस कोठडीत दोन्ही आरोपींची झडती घेण्यात आली. भूषण पाटील याच्या घरझडतीमध्ये गुन्ह्याच्या अनुषंगाने आठ पेन ड्राइव्ह मिळून आले आहेत. तसेच अभिषेक बलकवडे याच्याकडून तीन किलो सोने जप्त करण्यात आले आहे. मेफेड्रानच्या विक्रीतून आलेल्या पैशांतून ललित पाटील याने पाच किलो सोने घेतल्याचे अटक आरोपींकडे केलेल्या प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे.
ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!