समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; कर्मचाऱ्याकडे पिस्तूल….
छ. संभाजीनगर: फुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दोन टोल कर्मचाऱ्यांमधील वादातून झालेल्या झटापटीत पिस्तुलातून गोळी सुटून थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात लागली. यामुळे भरत घाटगे नावाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…
जालना : जालन्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील कडवंची जवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील हर्सूल सावंगी गावाजवळ कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यापैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हर्सूल सावंगी या ठिकाणी नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक 436 जवळ अपघात झाला होता. अपघातात तीन जण गंभीर जखमी तर […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…
अमरावतीः समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात झाला. ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर […]
अधिक वाचा...साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…
वाशीम : शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेऊन चंद्रपूरला जाणाऱ्या कारला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या घटनेत सात जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. सर्व जखमी हे चंद्रपूरचे रहिवासी आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळील पोहा गावाजवळ मंगळवारी (ता. २६) हा अपघात घडला. चंद्रपूरचे एक कुटुंब शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर दोन दिवस ब्लॉक…
पुणे : समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार असून, या कामांसाठी समृद्धी महामार्ग आज (मंगळवार) आणि उद्या बारा ते चार या वेळेत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगरदरम्याची वाहतूक या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; युवक ठार, तिघे गंभीर…
वाशिम : समृद्धी महामार्गावर शनिवारी (ता. ११) मध्यरात्री वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या कारंजा टोलनाक्याजवळ कारला भीषण अपघात झाला. या अपघातात एक जण ठार झाला असून, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिवाळीनिमित्त पुण्याहून वर्ध्याला गावी ४ युवक निघाले होते. समृद्धी महामार्गावरून जात असताना वाशिमच्या कारंजा टोल नाक्याजवळ नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर रविवारी (ता. १५) झालेल्या भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर तेवीस जण गंभीर जखमी झाले होते. आरटीओ अधिकारी वाहनाचा पाठलाग करत असल्यामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची माहिती पुढे आल्यानंतर दोन आरटीओ अधिकारी […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू; पाहा मृत आणि जखमींची नावे…
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील वैजापूर येथे दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू असून, २३ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये काही लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैलानी येथील दर्गाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला हा अपघात झालाआहे. समृद्धी महामार्गाच्या वैजापूर येथील जांबरगाव टोल नाक्याजवळ रात्री 1 ते दीड वाजेच्या […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्ग पुढील काही दिवसांसाठी राहणार बंद; कारण…
पुणे: समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार असल्यामुळे जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजूंची वाहतुक 10 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते साडेतीन वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात 25 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान दुपारी 12 ते 3 यावेळात बंद राहणार आहे, असे महाराष्ट्र राज्य […]
अधिक वाचा...
