नवले पुलावर ट्रकला भीषण अपघात; चार जणांचा होरपळून मृत्यू…

पुणेः पुणे शहरातील नवले पुलाजवळ कंटेनरला धडक बसल्यानंतर ट्रकने पेट घेतला आणि त्याला आग लागली. या आगीत ट्रकच्या केबीनमध्ये बसून प्रवास करणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. हा अपघात नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ सोमवारी (ता. १६) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला.

ट्रक मक्याचा भुसा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. ट्रक नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ आला असता, ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर असणाऱ्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात कंटेनर रस्त्यावरच उलटला आणि ट्रकला क्षणातच आग लागली. यात ट्रकच्या केबिन मध्ये बसलेल्या चार जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवून मृतदेह बाहेर काढले.

दरम्यान, नवले पुल आणि अपघात हे एक समीकरणच झाले आहे. या पुलावर आतापर्यंत अनेक जीवघेणे अपघात झाले असून त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या पुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले पाहायला मिळत आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे. सन 2014 पासून आतापर्यंत दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या साडे तीन किलोमीटरच्या अंतरात तब्बल 186 अपघात झाले आहेत. या अपघातांमधे आतापर्यंत 70 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 145 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…

बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला…

नगर-कल्याण मार्गावर भीषण अपघात! पाच मजुरांना चिरडले…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!