पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!
पुणे (संदीप कद्रे) : पुणे शहरचे सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची नाशिकच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्याचे आदेश गृहविभागाने मंगळवारी (ता. २१) सायंकाळी दिले. नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआयडी) मुंबई कार्यालयात विशेष पोलिस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक यांनी पावणेदोन वर्ष सहपोलिस आयुक्तपद भूषविले होते. गणेशोत्सव बंदोबस्तासह महत्वाच्या बंदोबस्ताची […]
अधिक वाचा...आपल्या कर्तव्यामुळे नावारूपाला आलेले पोलिस अधिकारी अक्षय सोनवणे…
सातारा जिल्ह्यातील दहीवडी पोलिस स्टेशनचे प्रभारी सपोनि अक्षय सोनवणे हे संयम आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र पोलिस दलात रूजू झाले. परिस्थितीशी दोन हात केल्यानंतर यश आपोआपच मिळते. फक्त त्यासाठी लढावे लागते… अल्प परिचय… अक्षय सोनवणे यांचा पुणे जिल्ह्याच्या मातीत जन्म झाला. पुरंदर तालुक्यातील कोडीत हे सोनवणे यांचे मूळ गाव. परंतु, लहान पणापासून वारजे माळवाडी, पुणे शहर […]
अधिक वाचा...ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…
पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाथा काळे आणि अमित जाधव असे या दोन पोलिसांची नावे असून हे दोघेही सध्या अटकेत आहेत. ललित पाटील याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश पुणे पोलिस आयुक्तांनी आज काढले आहेत. ललित […]
अधिक वाचा...उत्तराखंड बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांचा पहिला Video समोर…
डेहराडूनः उत्तराखंड मधील बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. गेल्या 10 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यामध्ये अडकून पडले आहेत. स्थानिक प्रशासनासह केंद्रीय यंत्रणा त्यांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत. या मजुरांचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे. उत्तरकाशीतील सिल्क्यरा 41 मजूर 12 नोव्हेंबरपासून अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे. […]
अधिक वाचा...पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…
मुंबईः मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणातून पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरळी पोलिस वसाहत येथे घडली आहे. इंद्रजित साळुंखे असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी मुंबई पोलिस दलात भरती झालेला इंद्रजित साळुंखे हा नायगाव मुख्यालय येथील शस्त्रास्त्र विभागात तैनात होता. इंद्रजित साळुंखे याचे गोरेगाव येथे राहणाऱ्या एका युवती सोबत प्रेमप्रकरण सुरू होते. इंद्रजित […]
अधिक वाचा...येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाने ठोकली धूम…
पुणे : येरवडा कारागृहातून एका कुख्यात गुंडांने धूम ठोकल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २०) दुपारी तुरुंगातील कैद्यांची मोजणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. आशिष जाधव असे कारागृहातून फरार झालेल्या गुंडाचे नाव आहे. पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत २००८ साली एका […]
अधिक वाचा...मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…
पुणे (संदीप कद्रे): कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या अंकुश थोरात व त्याच्या साथीदारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. अंकुश सूर्यकांत थोरात (वय २९, रा. ताडीवाला रोड, मूळ छत्रपती संभाजीनगर) आणि मिथुन शिवदास कांबळे (वय ३०, रा. ताडीवाला रोड) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत. कसबा पेठेतील पवळे चौकात मेट्रो […]
अधिक वाचा...Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…
पुणे : पिरंगुट (ता. मुळशी) घाटात भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक देत अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कोलाड-पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात भीषण अपघात झाला आहे. तीव्र उतारावर एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने अनेक वाहनांना उडविले. या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर दोन दिवस ब्लॉक…
पुणे : समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार असून, या कामांसाठी समृद्धी महामार्ग आज (मंगळवार) आणि उद्या बारा ते चार या वेळेत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगरदरम्याची वाहतूक या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम […]
अधिक वाचा...लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा परिसरात असलेल्या आतवण टायगर पॉईंट येथील वेळेचे निर्बंध न पाळणारे ४ व्यावसायीक तसेच गोंधळ करणाऱ्या १४ पर्यटकांवर लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी कारवाई केली आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीमधील मौजे आतवण (ता. मावळ जि. पुणे) गावचे हद्दीधील […]
अधिक वाचा...
