
पुणे शहरात दोन चिमुकल्या मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार…
पुणे : पुणे शहरातील वानवडी परिसरात धावत्या स्कूल बसमध्ये बस चालकाने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी ४५ वर्षांच्या बस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बस चालकाने सहा वर्ष चिमुकलीसह तिच्या मैत्रिणीवर गेल्या चार दिवसापासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी हा एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे काम करतो. या आरोपीच्या बस मध्ये दोन्ही पीडित चिमुकल्या मुली पुढच्या सीटवर बसत होत्या.
आरोपी दोन्ही चिमुकल्या मुलींसोबत बसून त्यांच्यासोबत लैंगिक चाळे करत होता. तसेच याची वाच्यता कुठे केली तर धमकी सुद्धा देत असल्याचे पीडित मुलींनी सांगितले आहे. अल्पवयीन चिमुकली घरी आल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टला वेदना होत होत्या. यानंतर मुलीच्या आईने याची विचारपूस केल्यानंतर चिमुकलीने घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…
संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार…
पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
पुणे शहरात 85 वर्षीय वृद्ध महिलेवर 23 वर्षीय नराधमाने केला बलात्कार…
बदलापूर अत्याचार! आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण…

