महामार्गावरील खड्ड्यामुळे महिलेच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल…
ठाणे : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीच्या अपघातात पूजा गुप्ता या महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी महामार्गाचे ठेकेदार आणि कंपनीविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पूजा गुप्ता (वय 27) ही विवाहित महिला पतीसोबत मालाड पश्चिमेच्या आकाशवाणी येथील वृंदावर अपार्मटमेंट मध्ये राहत होती. 9 ऑगस्ट वसईत राहणार्या पूजा यांच्या मामेबहिणाचा वाढदिवस होता. त्यासाठी पूजा तिचा दीर दिपक गुप्ता (वय 24) याच्या मोटारसायकलीवर (एमएच 47 बीसी 5390) पूजा मागे बसली होती. रात्री 9 च्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बापाणे पूलावरून दुचाकी खाली उतरत असताना मध्येच असलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. यावेळी मागे बसलेली पूजा खाली पडली आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. उपचारासाठी त्यांना गोखिवरे येथील प्लॅटीनम या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, 10 दिवसांच्या उपचारानंतर मृत्यू झाला होता.
तक्रारीवरून नायगाव पोलिसांनी महामार्ग दुरुस्ती आणि व्यवस्थापनाचे काम करणारे ठेकेदार आणि कंपनीच्या मालकाविरोधात निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तपासात पूजा गुप्ता हिचा मृत्यू खड्डय़ात पडून झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे संबंधित ठेकेदार आणि कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नायगाव पोलीसांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…
आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! भावाला राखी बांधायला निघालेल्या बहिणीला मृत्यूनं रस्त्यातच गाठलं…
महिलेच्या प्रसुतीसाठी निघालेल्या आरोग्य सेविकेचा अपघाती मृत्यू…
गर्भवती बहिणीला घेऊन घरी निघालेला भावंडांचा हृदयद्रावक शेवट…