Video:पाकमध्ये झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू असतानाच झाला बॉम्बस्फोट…
कराची : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या बॉम्बस्फोटात ४० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १५० जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, काही नेते व्यासपीठावर उभे राहून भाषण करत आहेत. यावेळी समर्थक जमाव झिंदाबाद-झिंदाबादच्या घोषणा देत आहेत. व्हिडिओमध्ये १२ सेकंद झिंदाबाद झिंदाबादचे नारे सुरू असताना मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर आरडाओरडा आणि नागरिक जीव वाचविण्यासाठी धावू लागले.
संबंधित दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्वीकारलेली नाही, पण हा हल्ला खैबर पख्तूनख्वामध्ये झाला असल्याने टीटीपीच्या दिशेने संशयाची सुई आहे. हा संपूर्ण भाग अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असल्याने अनेक वेळा पाकिस्तानी तालिबानकडून येथे मोठे आणि प्राणघातक हल्ले झाले आहेत. सध्या या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींना सोडले जाणार नाही, असे आश्वासनही सरकारने दिले आहे.
पाकिस्तानमध्ये जमियत उलेमाच्या रॅलीत बॉम्बस्फोट; ३५ ठार…
Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…
पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…
पाकिस्तानात मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा…