समृद्धी महामार्गावर दोन दिवस ब्लॉक…

पुणे : समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार असून, या कामांसाठी समृद्धी महामार्ग आज (मंगळवार) आणि उद्या बारा ते चार या वेळेत वाहतुकीसाठी बंद असणार आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगरदरम्याची वाहतूक या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन आणि अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजुंची वाहतूक आज आणि उद्या असे दोन दिवस दुपारी 12 ते 4 यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. उर्वरित कालावधीमध्ये वाहतूक सुरळीत सुरू राहील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.

दरम्यान, समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाय योजना राबवण्यात येत आहेत. सोमवारी देखील या महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर वनोजा ते कवरदरीच्या दरम्यान कार आणि रुग्णवाहिकेमध्ये भीषण अपघात घडला. यामध्ये एक जण ठार तर 9 जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; युवक ठार, तिघे गंभीर…

समृद्धी महामार्ग अपघात प्रकरणी दोन आरटीओ अधिकाऱ्यांना अटक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…

समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!