
रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात; २० मोबाईल जप्त…
पुणे (संदिप कद्रे): रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून २० मोबाईल फोन जप्त केले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!
फिर्यादी ऋतुराज दिलीपराव काटकर (वय २६ वर्षे, धंदा नोकरी, जगदंबा सोसायटी, वडगाव शेरी, पुणे) यांचे मित्र नामे संजय मडीया डिन्डोड हे ३०/०८/२०२५ रोजी २०.५० वा.च्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नं. १ वर उभ्या दानापुर एक्स. गाडीच्या इंजिनकडील बाजुच्या जनरल डब्यात चढत असताना त्यांचा १५,०००/- रू. किंमतीचा एक विवो कंपनीचा मोबाईल फोन कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला असल्याने त्यांनी पुणे लोहमार्ग पोलिस ठाणेत फिर्याद दिली होती. नमुद दाखल गुन्हयाचा तपासा करताना गुप्त बातमीदार मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की, काही संशयित हे मंगळवार पेठ सिग्नल चौकात झोपडी टाकुन राहतात व तेथे पुण्यातील सामान्य नागरीकांचे मोबईल चोरून ते स्वतःच्या कब्जात बाळगुन आहेत. पुणे लोहमार्ग पोलिस ठाणेकडील सर्वेलन्स पथकातील पोलिस अधिकारी/अंमलदार व आरपीएफ पुणे युनिट यांनी संयुक्तीक रित्या मंगळवार पेठ सिग्नल चौकात जावून छापा मारला. सदर ठिकाणी संशयित १) बुध्दराज मोरपाल बागडी (वय ३२ वर्षे, राह. मु.पो. डिलोदा, ता. बारा, जि. बारा. राज्य राजस्थान., सध्या राह. मंगळवार पेठ, पुणे.), २) अमरलाल हंसराज बागडी (वय २२ वर्षे, राह. बडा का बालाजी, ता. बारा, जि. बारा, राज्य राजस्थान., सध्या राह. मंगळवार पेठ, पुणे) हे दोघेजण पोलिसांना पाहून पळू लागले असता त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले. त्यांनतर आम्ही ते राहत असलेले झोपडीची झडती घेतली असता, वरील नमुद गुन्हयातील गेले मालातील विवो कंपनीचा मोबाईल व इतर वेगवेगळया कंपनीचे १९ मोबाईल फोन असे एकुण १,९०,४००/- रू. किंमतीचे २० मोबाईल फोन जप्त केले आहेत.
सदर मोबाईल बाबत पोलिसी खाक्या दाखवुन चौकशी करता, अशी माहिती मिळाली आहे की, सदरचे दोन जण हे जुन्या बाजारातुन कोणत्याही प्रकारची खात्री न करता मोबाईल विकत घेतात व कोणत्याही ग्राहकास क्षुल्लक किंमतीत विकतात असे निष्पन्न झाले आहे. त्याप्रमाणे संशयीत दोघांना शिताफीने पकडून
ताब्यात घेतले असुन त्यांनी सदरचे मोबाईल फोन चोरी केल्याचे कबुल केल्याने त्यांना वरील गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही अश्विनी सानप, पोलिस अधीक्षक, लोहमार्ग पुणे, रोहिदास पवार अपर पोलिस अधीक्षक, लोहमार्ग पुणे, जयराम पायगुडे, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद खोपीकर, पोलिस उपनिरीक्षक श्री यशवंत साळुंके, सपोफौ. सुनिल कदम, सपोफौ. अनिल दांगट, पो.हवा. ५७ निलेश बिडकर, पो.शि. ६५८ सिध्दार्थ वाघमारे, पो.शि. ११५ नेमाजी केंद्रे व म.पो.शि. १३१५ मारटकर, मपोहवा छाया चव्हाण, मपोशि १४४४ शखे सर्व नेमणुक पुणे लोहमार्ग पोलिस ठाणे तसेच आरपीएफ पुणे कडील निरीक्षक यादव, उपनिरीक्षक लाड, आरक्षक युवराज गायकवाड, विशाल माने, रसुल सय्यद यांनी केली आहे.
पुणे! चतुश्रृंगी पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणाऱ्या आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई…
पुणे! गौतमची पाच दिवस मृत्यूशी झुंज; कुत्र्यावर दया अन् केसं-दाढी…
पुणे ! प्रेयसीच्या मानलेल्या भावाचा कात्रज घाटात केला खून…
पुणे! दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांची तत्परता अन् कुटुंब आले एकत्र…
पुणे पोलिसांनी सराईत गुन्हेगारास गावठी पिस्टलसह केले जेरबंद…

