येरवडा कारागृहातून कुख्यात गुंडाने ठोकली धूम…
पुणे : येरवडा कारागृहातून एका कुख्यात गुंडांने धूम ठोकल्यामुळे खळबळ उडाली आहे. कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २०) दुपारी तुरुंगातील कैद्यांची मोजणी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
आशिष जाधव असे कारागृहातून फरार झालेल्या गुंडाचे नाव आहे. पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत २००८ साली एका व्यक्तीची हत्या झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी जाधव याला अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. आरोपी आशिष जाधव याची तुरुंगातील वागणूक पाहता, त्याला येरवडा कारागृह प्रशासनाने रेशन विभागात काम करण्यासाठी नियुक्त केले होते. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.
कारागृह अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २०) दुपारी तुरुंगातील कैद्यांची मोजणी केली त्यावेळी आरोपी आशिष जाधव आढळला नाही. कारागृहात शोध घेत इतर कैद्यांना आरोपीबाबत विचारले. पण, त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, असे कैद्यांनी सांगितले. आरोपीच्या शोधात पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
येरवडा कारागृहातील बंद्यांनी सलग दुसऱ्यांदा मिळवला राष्ट्रीय विजेते पदाचा मान!
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची येरवडा कारागृहात आत्महत्या…
येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…
कारागृहातील विभागातील अधिक्षकांची पदोन्नती; पाहा नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!