मोक्का ८७! कसबा पेठेत दहशत पसरणाऱ्या थोरात टोळीवर मोक्का…

पुणे (संदीप कद्रे): कसबा पेठेत दहशत पसरवून लुटमार करणाऱ्या अंकुश थोरात व त्याच्या साथीदारावर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. अंकुश सूर्यकांत थोरात (वय २९, रा. ताडीवाला रोड, मूळ छत्रपती संभाजीनगर) आणि मिथुन शिवदास कांबळे (वय ३०, रा. ताडीवाला रोड) अशी मोक्का कारवाई झालेल्यांची नावे आहेत.

कसबा पेठेतील पवळे चौकात मेट्रो स्टेशनचे काम करणारे कामगार चहा पिऊन परत कामावर जात असताना अंकुश थोरात व कांबळे यांनी त्यांच्याशी भांडणे केली. त्यांना रिक्षात डांबून ठेवले. चाकूचा धाक दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन मोबाइल फोन व फोन पेद्वारे पैसे ट्रान्सफर करून घेतले होते. अंकुश थोरात याने प्रत्येक गुन्ह्यात वेगवेगळ्या साथीदारासह गुन्हे केले आहेत. पुणे शहर, पिंपरी व छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हेगारी कारवाया करून दहशत निर्माण केली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्याकडे पाठविला. पाटील यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारीक लक्ष देवुन, शरीराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजा मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मोक्का अंतर्गत केलेली ही ८७वी कारवाई आहे.

मोक्का ८६! ‘आम्ही भाई लोक आहोत’ असे बोलून दहशत निर्माण करणाऱ्यांवर कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची धोत्रे टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ८०वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७८वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार त्यांची मकोका अंतर्गत ७७वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मकोका अंतर्गत ७४वी कारवाई…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत ७१ वी कारवाई; पाहा आरोपींची नावे…

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे एमपीडीए कारवाईचे अर्ध शतक…

ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…

पुणे शहरात बुलेट सायलेन्सरमधून आवाज काढणाऱ्यांवर कारवाई…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!