Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…

पुणे : पिरंगुट (ता. मुळशी) घाटात भरधाव टेम्पोने अनेक वाहनांना धडक देत अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

कोलाड-पुणे महामार्गावर पिरंगुट घाटात भीषण अपघात झाला आहे. तीव्र उतारावर एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने अनेक वाहनांना उडविले. या घटनेत अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. मालवाहू टेम्पोचा ताबा सुटल्यानंतर टेंम्पोने पाच दुचाकी आणि एका कारला धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

दरम्यान, पिरंगुट घाटात अवजड वाहनांच्या अपघातांची मालिकाच सुरू आहे. उतारावर अपघात रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख यांनी त्वरित पाहणी करून तातडीने उपाययोजना अंमलात आणाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Video: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पुलाजवळ भीषण अपघात; दोघांचा मृत्यू तर…

Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…

हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…

Video क्रूरतेची हद्द! युवकाच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले…

कारने पाच युवतींना चिरडले; अंगावर काटा आणणारा Video…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!