
प्रेमविवाहानंतर पत्नी निघून गेली अन् भाऊ पोहचेपर्यंत सगळं संपलं होतं…
सोलापूर: प्रेमविवाह केल्यानंतर किरकोळ वादातून युवकाने भावाला लोकेशन पाठवत गळफास घेतला. हिराजी मारुती देढे (वय २५) असे मृत युवकाचे नाव आहे. सलगरवस्ती पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील हिराजी देढे हा युवक ड्रायव्हर म्हणून काम करत होता. काही महिन्यांपूर्वीच त्याचा प्रेमविवाह झाला होता. मंगळवारी त्याचा पत्नीसोबत किरकोळ वाद झाला. त्यामुळे पत्नी घरातून निघून गेली. याच रागातून हिराजीने साळुंखे यांच्या शेतात गळफास घेतला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
हिराजीने आत्महत्येपूर्वी आपल्या भावाला फोन केला होता. त्याने कुठे गळफास घेणार याबाबत देखील भावाला सांगितले होते. भाऊ समजावून सांगत होता, मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अचानक त्याने फोन बंद केला. भावाने सांगितलेल्या ठिकाणाकडे धाव घेतली, मात्र तोपर्यंत सगळं संपलेले होते.
दरम्यान, देगाव शिवारात हिराजी याची दुचाकी आणि मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच सलगर वस्ती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हवालदार आर. एस. मामुरे यांनी इतरांच्या सहाय्याने मृतदेह खाली उतरवत शासकीय रुग्णालयात दाखल केला. डॉक्टरांनी हिराजीला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुणे! आळंदीतील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; सोशल मीडियावर ओळख; प्रेमविवाह अन्…
प्रेमविवाहानंतर सोडली पत्नीने साथ; हृदय पिळवटून टाकणारा शेवटचा व्हिडिओ…
प्रेमविवाहानंतर पत्नीने अश्लिल चाळे करतानाचा व्हिडिओ पाहिला अन्…
प्रेमविवाह केलेल्या IAS अधिकाऱ्याच्या गर्भवती मुलीने संपवलं आयुष्य…

