पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…

मुंबईः मैत्रिणी सोबत झालेल्या भांडणातून पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरळी पोलिस वसाहत येथे घडली आहे. इंद्रजित साळुंखे असे या पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे. दोन वर्षापूर्वी मुंबई पोलिस दलात भरती झालेला इंद्रजित साळुंखे हा नायगाव मुख्यालय येथील शस्त्रास्त्र विभागात तैनात होता.

इंद्रजित साळुंखे याचे गोरेगाव येथे राहणाऱ्या एका युवती सोबत प्रेमप्रकरण सुरू होते. इंद्रजित याचे मैत्रिणीसोबत काही कारणावरून वाद झाला होता. या वादातून त्याने मैत्रिणीला फोन करून आत्महत्या करीत असल्याची धमकी देखील दिली होती. परंतु, मैत्रिणीने त्याकडे लक्ष न दिल्यामुळे त्याने मैत्रिणीला मृत्यूपूर्वी गळफास घेत असल्याचा फोटो पाठवला होता आणि तिला कळवले की गळफास लावून आपले जीवन संपवणार आहे. त्यानंतर घराजवळ असलेल्या लायब्ररीमध्ये त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

इंद्रजित हा दुसऱ्या मुलीसोबत इन्स्टाग्रामवर चॅट करीत असल्यामुळे मैत्रीण आणि त्याच्यात भांडण झाले होते. या भांडणातून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वरळी पोलिसांनी या प्रकरणी मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…

टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!