लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): लोणावळा परिसरात असलेल्या आतवण टायगर पॉईंट येथील वेळेचे निर्बंध न पाळणारे ४ व्यावसायीक तसेच गोंधळ करणाऱ्या १४ पर्यटकांवर लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी कारवाई केली आहे.
लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी स्वतः पथकासह लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्याचे हद्दीमधील मौजे आतवण (ता. मावळ जि. पुणे) गावचे हद्दीधील टायगर पॉईंट या पर्यटन स्थळावर १९/११/२०२३ रोजी ०१:०० वा. चे सुमारास वेळेचे निर्बंध न पाळता ४ टपरी व्यवसायीकांनी आपला व्यवसाय चालू ठेवलेल्या स्थितीमध्ये मिळून आले होते. त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३ (डब्ल्यू) अंतर्गत तसेच सदर ठिकाणी पर्यटनाकरीता आलेले १४ पर्यटक गोंधळ करुन शांतता भंग करीत असताना मिळून आल्याने त्यांचेविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदयातर्गत कारवाई करण्यात आली आहे. यापुर्वीही याच ठिकाणी अशाप्रकारे कारवाई करण्यात आली असून यापुढेही सदर ठिकाणी व्यवसाय करणारे व्यवसायीकांनी वेळेचे निर्बंध पाळून सकाळी ०६:०० वा. पासून ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत आपला व्यवसाय करावा. पर्यटनाकरीता आलेल्या पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे गोंधळ गोंगाट करुन सार्वजनीक शांतता भंग करु नये व कोणीही दारुचे सेवण करुन वाहन चालवू नये, असे आवाहन लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी आवाहन केले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यसाई कार्तीक, सहा. पोलिस अधीक्षक, लोणावळा विभाग लोणावळा व त्यांचे पथकामधील सहा. पोलिस निरीक्षक/ सचिन राउळ, पो.हवा. / अंकुश नायकुडे, म. पो. हवा. / आशा कवठेकर, पो. शि. / अंकुश पवार, सुभाष शिंदे, लोणावळा ग्रामीण पोलिस स्टोनचे पोलिस कडील पोलिस उपनिरीक्षक / सागर अरगडे, पो.हवा. / नितीन कदम, पो. शि. / केतन तळपे, राहुल खैरे, नागेश कमठणकर, लोणावळा शहर पोलिस स्टेशनकडील पोलिस उपनिरीक्षक / लतीफ मुजावर, पो. शि/ भुषण कुवर, कामशेत पोलिस स्टेशनकडील पोलिस उपनिरीक्षक / शुभम चव्हाण, पो. शि/ अमोल ननवरे, वडगांव मावळ पोलिस स्टेशनकडील महिला पोलिस उपनिरीक्षक / रुतुजा मोहिते, पो.हवा. / सचिन गायकवाड, पो. शि. / चेतन कुंभार यांनी केली आहे.
लोणावळा परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
लोणावळा येथे संकल्प नशामुक्ती अंतर्गत नशेखोरांना न्यायालयाने ठोठावला दंड…
लोणावळा येथे पर्यटकांच्या वाहनांच्या काचा फोडून चोरी करणारा ताब्यात…
सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…