खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; लैंगिक अत्याचाराच्या आरोपामुळे दिल्लीतही सर्वत्र तपास…
नवी दिल्ली: गाझियाबादच्या खासदार-आमदार न्यायालयाने २०१८ मधील एका मारहाणीच्या प्रकरणात, खासदार चंद्रशेखर आझाद यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वेळोवेळी वॉरंट जारी केल्यानंतरही न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्याने हे वॉरंट बजावण्यात आले आहे. न्यायालयात हजर न राहिल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे. दरम्यान, दिल्लीत आझाद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणाऱ्या तक्रारीच्या संदर्भात, […]
अधिक वाचा...खंडणीची मागणी करणाऱ्या दोन महिलांना मुंबईत अटक; डोशात उंदीर सापडल्याचा बहाणा…
मुंबईः बोरिवली पश्चिमेकडील ‘राधाकृष्ण हॉटेल बँक्वेट फास्ट फूड’च्या मालकाकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, बोरिवली पोलिसांनी दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या महिलांनी हॉटेल व्यावसायिक जय शाह (वय ४४) यांच्याकडून आधी १ लाख रुपये उकळले आणि त्यानंतर आणखी ६ लाखांची मागणी केली होती. मानसी आचार्य (वय ३६) आणि किंजल भाटिया (वय २९) अशी […]
अधिक वाचा...निलंबित केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पा सावकार व सदस्य गीता यांना अटक; भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई…
बंगळूर: अंमलबारी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा एस. सावकार आणि सदस्य बी. व्ही. गीता यांना अटक केली आहे. काही परीक्षांच्या आयोजनातील अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी, अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांना अटक केली. शिवशंकरप्पा सावकार आणि बी. व्ही. गीता यांना ६ ऑक्टोबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए तरतुदींनुसार ताब्यात […]
अधिक वाचा...भोंदूबाबा म्हणाला; अंगात शिरले भूत अन् केला लैंगिक अत्याचार…
सातारा : शाळकरी मुलीच्या अंगात भूत शिरल्याची बतावणी करत जादूटोणा करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी, आरोपी भोंदूबाबाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी संशयित आरोपी सौरभ नाना मदने याच्याविरुद्ध फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताने पीडितेच्या अंगातील भूत काढण्याच्या […]
अधिक वाचा...आकाशवाणी भवनात बेकायदा धरणे; राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी केली एफआयआर दाखल…
नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात झालेल्या इंडिया ब्लॉक आंदोलनादरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वद्रा यांनी मंगळवारी (ता. ६) आकाशवाणी भवनच्या आवारात अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी, दिल्ली पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, विरोधी पक्षांच्या आघाडीने संसद भवनापासून निर्वाचन सदनापर्यंत (नवी दिल्लीतील निवडणूक आयोगाचे मुख्यालय) मोर्चा […]
अधिक वाचा...महाराष्ट्रात धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिसांना मिळणार ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’; पाहा निवड प्रक्रिया…
मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांच्या असीम धैर्याचा, शौर्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कर्तव्यावर असताना स्वतःच्या जिवाची पर्वा न करता साहसी आणि धाडसी कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता “मुख्यमंत्री शौर्य पदक” देऊन सन्मानित केले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या […]
अधिक वाचा...नागपूर! चिमुकलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्याला बेदम चोप; ; उपचारादरम्यान मृत्यू…
नागपूर : नागपूरच्या पारडी पोलिस स्टेशनांतर्गत एका वस्तीत नऊ वर्षाच्या चिमुकलीसोबत लैंगिक चाळे करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याच्या संशयातून स्थानिक जमावाने आरोपीस बेदम मारहाण केली होती. सोमवारी घडलेल्या मारहाणीच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान, आरोपी नारायणदास वैष्णव याचा मंगळवारी (ता. ६) उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. आरोपी नारायणदास वैष्णव […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन; कारण आलं पुढं…
नाशिक : पोलिस पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका महिलेने विष प्राशन करून जीवन संपवले आहे. विष घेतल्यानंतर तिने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी स्वत: गाडी चालवत रुग्णालयात धाव घेतली. मात्र पतीने तिला सोडून रुग्णालयातून पळ काढला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच नाशिकच्या पोलिस दलात खळबळ उडाली आहे. दीपाली अनिल पवार (वय ३२, रा. क्लासिक […]
अधिक वाचा...माथेफिरूचा महाविद्यालयीन तरुणीवर चाकूहल्ला; तरुणी गंभीर जखमी तर आरोपी पोक्सो कायद्यांतर्गत अटकेत…
नांदेड: एकतर्फी प्रेमातून माथेफिरु तरुणाने बारावीमध्ये शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याने, नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयातून ही तरुणी मैत्रिणीसोबत घरी जात असताना, एका माथेफिरूने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. तरुणीने बोलण्यास नकार दिल्याने, संतापलेल्या रोहित पोहरे नावाच्या तरुणाने या विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने वार […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! राहुरीत आईने दोन चिमुकल्यांसह संपवली जीवनयात्रा…
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे एका महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह जीवनयात्रा संपवल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव वंदना गणेश गाडे (वय ३३) असे असून, तिच्यासोबत चैतन्य आणि जीवन या दोन चिमुकल्यांचाही मृत्यू झाला आहे. कौटुंबिक वाद आणि पतीकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला कंटाळून वंदना यांनी हे […]
अधिक वाचा...
